जेव्हा आमीर- राणी 'ये क्या बोलती तू' सोडून 'निसर्ग राजा ऐक सांगतो' गातात..
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2018 01:35 PM (IST)
विविध अॅप्स तर लोकांच्या क्रिएटिव्हीटीला चालनाच देत आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या विविध कला सोशल मीडियावर शेअर करत राहतात.
मुंबई: आपल्याकडे क्रिएटिव्ह माणसांचा अजिबात तुटवडा नाही हे सोशल मीडियामुळे वारंवार दिसून येत आहे. या क्रिएटिव्ह माणसांना आतापर्यंत संधी मिळत नव्हती, पण अशा लोकांसाठी सोशल मीडिया हा उत्तम प्लॅटफॉर्म ठरत आहे. विविध अॅप्स तर लोकांच्या क्रिएटिव्हीटीला चालनाच देत आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या विविध कला सोशल मीडियावर शेअर करत राहतात. मग ते विविध डायलॉग असो, व्हिडीओ असो किंवा गाणी असोत. विविध भन्नाट आयडिया आपण पाहिल्या आहेत. गाण्यांचे बोल बदलून, खऱ्या गाण्याला दुसरेच शब्द जोडून एडिट केलेली गाणी आपण सोशल मीडियावर पाहिलीच आहेत. असंच एक भन्नाट एडिटिंग आमीर खान आणि राणी मुखर्जी यांच्या गुलाम सिनेमातील गाण्याचं केलं आहे. ये क्या बोलती तू या गाण्याचे शब्द बदलून, त्याला निसर्ग राजा ऐक सांगतो, या मराठीतील गाजलेल्या गाण्याचे शब्द जोडले आहेत. या गाण्याचा निर्माता कोण आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. कसं आहे हे गाणं – पाहा मूळ गाणे