मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी आपल्या 15 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी संयुक्त निवेदन जाहीर करत आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर दंगल चित्रपटातील अभिनेत्री आणि आमीर खान यांची मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्समधून ही दंगल गर्लच या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे दाखवले जात आहे.


अभिनेत्री फातिमा सना शेख आणि आमिरने 2016 मध्ये 'दंगल' या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून फातिमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर, इंडस्ट्रीत या दोघांच्या रोमान्सच्या अफवा पसरल्या. यावर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी फातिमाने दिली होती.


15 वर्षांच्या संसारानंतर आमीर आणि किरण यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर #FatimaSanaShaikh हा हॅशटॅग ट्विटरवर मीम्ससह ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. या मीम्सच्या माध्यमातून फातिमाला ट्रोल केलं जात आहे. या दोघांच्या विभाजनाला फातिमा कारणीभूत असल्याचा या मीम्सचा रोख आहे.


 
















..परिवार म्हणून एकच राहणार 
आपल्या संयुक्त निवेदनात आमिर खान आणि किरण राव पुढे म्हणतात की, "एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो."