Babita Phogat Reveals About Dangal Movie : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान याचा दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला होता. या चित्रपटाने जगभरात 2000 कोटीची कमाई केली. या चित्रपटामुळे फोगाट कुटुंबालाही प्रसिद्धी मिळाली. दंगल चित्रपटात महावीर फोगाट आणि त्यांच्या मुली गीता, बबीता यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत आता बबीता फोगाटने मोठा खुलासा केला आहे. दंगल चित्रपटाने 2000 कोटी कमावले पण फोगाट कुटुंबाला फक्त एक कोटी रुपये देण्यात आले होते, असा खुलासा बबीता फोगाटने केला आहे.
दंगल चित्रपटाबाबत बबीता फोगाटचा मोठा खुलासा
भारताची माजी कुस्तीपटू बबीता फोगाटने (Babita Phogat) कुस्तीतून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता बबीता फोगाट हिने दंगल (Dangal Movie) चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. बबीता फोगाटने म्हटलं आहे की, दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींहून अधिक कमाई केली होती. पण, फोगाट कुटुंबाला निर्मात्यांकडून फक्त एक कोटी रुपये मोबदला मिळाला होता. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित आहे.
"आमिर खानच्या 'दंगल'ने कमावले 2000 कोटी आम्हाला फक्त..."
बबिता फोगटला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की, "दंगल चित्रपटाने 2000 कोटी रुपये कमावले, तर फोगट कुटुंबाला फक्त 1 कोटी रुपये मिळाले का?" यावर बबिता फोगटने, हो असे उत्तर दिलं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमावल्यानंतर फोगट कुटुंबाला केवळ 1 कोटी रुपये मिळाल्याने निराश झाले का असा प्रश्नही तिला यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बबिता म्हणाली की, तिच्या कुटुंबाचं ध्येय प्रेम आणि आदर मिळवणं आहे. न्यूज24 ला दिलेल्या मुलाखतीत बबीता फोगाटने हा खुलासा केला आहे.
दंगल चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
दंगल चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने भारतात 387.39 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचं बजेट अंदाजे 90 कोटी होतं, त्यापैकी 70 कोटी रुपये निर्मितीवर आणि 20 कोटी रुपये प्रमोशन आणि मार्केटिंगवर खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने केवळ भारतात 297.39 कोटी रुपयांचा नफा कमावला होता आणि या व्यतिरक्त जगभरात या चित्रपटानं कोट्यवधींचं कलेक्शन केलं. यामुळेच हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट मानला गेला होता. या चित्रपटाची कथा महिला कुस्तीमध्ये जागतिक दर्जाचा ठसा उमटवणाऱ्या महावीर सिंह फोगाट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित होती.
दंगल चित्रपटातून आमिर खानची कमाई किती?
दंगल हा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा हिट मानला जातो आणि यामध्ये आमिर खानचा दमदार अभिनय आणि फोगाट कुटुंबाची प्रेरणादायी कथा या दोन्हींचा मोठा वाटा आहे. फोगाट कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यात आले होते, तर आमिर खानने या चित्रपटातून भरपूर कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, दंगल चित्रपटासाठी आमिर खानची सामान्य फी 35 कोटी रुपये होती, पण नफा शेअरिंगमुळे त्याने या चित्रपटातून 375 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :