मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात गफलत करत नाही. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्वत:ला झोकून देऊन काम करतो, तर शूटिंग झाल्यावर तो मुलांना, कुटुंबाला वेळ देतो.


नुकताच काल आमीर खानची पहिली पत्नी रीनाचा वाढदिवस झाला. स्वत: आमीरने या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रीनाने आपला 50 वा बर्थडे सेलिब्रेट केला. हा क्षण खास करण्यासाठी स्वत: आमीर खानही उपस्थित होता.

रीना केक कापत असताना, आमीर खान शॅम्पेनची बाटली उघडत असताना या व्हिडीओत दिसतं. यावेळी आमीर आणि रीनाची दोन्ही मुलं ईरा आणि जुनैद हे सुद्धा उपस्थित होते.

सध्या आमीर खान त्याच्या आगामी सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून आमीर या वाढदिवसाला हजर होता.

आमीर आणि रीना यांनी 1986 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी आमीर खान 21 आणि रीना 20 वर्षाची होती.

आमीरच्या करियरमध्ये रीनाची महत्त्वाची भूमिका होती. रीना ही आमीरच्या तुफान गाजलेल्या ‘लगान’ या सिनेमाची प्रोड्युसरही होती.



लग्नाच्या 16 वर्षानंतर आमीर आणि रीना वेगळे झाले होते, दोघांनी 2002 मध्ये घटस्फोट घेतला होता. दोन्ही मुलांचा ताबा रीनाला मिळाला होता.

यानंतर 2005 मध्ये आमीर खानने किरण रावशी लग्न केलं. त्यांना 2011 मध्ये सरोगसीद्वारे आझाद हा मुलगा झाला.