Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेता मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. आता मिलिंद गवळी यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिरुद्धच्या वागणुकीचं कौतुक केलं आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट काय? (Milind Gawali Post)
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा स्टँड घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्ध च नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही परिस्थितीत माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, सरप्राइज करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला संहिता वाचतो. त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक आनंद येतो आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात. मनातल्या मनात नमिता वर्तक हिला थँक्यू सुद्धा म्हणत असतो. पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हवी, योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी".
मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे. ती म्हणजे खात्यामध्ये भष्ट्राचार आहे. पण एखादा पोलिस वाला कितीही भष्ट्र असला तरी असं म्हटलं जातं की रेप, मर्डर, दारू, ड्रग्ज या केसमध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही. गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही. कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या दृश्यामध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो. त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्धची एक नव्याने ओळख होत जाते आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो. खरं तर माझ्या हातात काहीच नाही. लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात. पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे".
अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच 'आई कुठे काय करते' मालिकेसंबंधित पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर ते चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. वैयक्तिक आयुष्यासह सामाजिक विषयांवर ते व्यक्त होत असतात.
संबंधित बातम्या