मुंबई : संगीतकार ए आर रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. 'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाच्या संगीतासाठी ए आर रहमान 89 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहे.


बेस्ट ओरिजनला स्कोअर आणि बेस्ट ओरिजनल सॉन्ग अशा दोन गटात रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.

'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाचं संगीत आणि त्यातील जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर अॅना बिट्रीझने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.

'पेले: द बर्थ ऑफ लिजंड' हा अमेरिकन बायोपिक आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटात पेले यांची भूमिका केविन डी पाउलाने साकारली आहे.

यापूर्वी ए आर रहमानला स्लमडॉग मिलिनेअरमधील 'जय हो' गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर रहमान पुन्हा एकदा रहमान ऑस्करवर नाव कोरतो का, हे येत्या 26 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.