800 Trailer: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचे (Muttiah Muralitharan) आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. लवकरच त्याचा 800 नावाचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 800 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये मुरलीधरनच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, तसेच त्याला क्रिकेट खेळताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, या गोष्टींची झलक दाखण्यात आली आहे.
800 या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, मुरलीधरनच्या भूमिकेत असलेला अभिनेता मधुर मित्तल हा बॉलिंग करत आहे. त्यानंतर मुरलीधरनच्या बालपणाची झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती मुरलीधरनला बेस्ट बॉलर असं म्हणतो. 800 या चित्रपटाचा ट्रेलर तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे.
800 या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मधुर मित्तलच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. भारत, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये 800 या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. 800 या चित्रपटामध्ये मुथय्या मुरलीधरनची भूमिका आधी अभिनेता विजय सेतूपती साकारणार होता, असं म्हटलं जात आहे.
एम.एस. श्रीपती यांनी 800 या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. क्रिकेटपटू मुरलीधरन हा यशस्वी गोलंदाज कसा बनला, हे 800 या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दाखवले जाणार आहे.
800 या चित्रपटामधील अभिनेता मधुर मित्तलनं 'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सलीम ही भूमिका साकारली होती. आता त्याच्या 800 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मधुर मित्तलनं मिलियन डॉलर आर्म,कहीं प्यार ना हो जाये या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 800 हा चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.
तरण आदर्श यांनी 800 चित्रपटाचा एक खास व्हिडीओ ट्वीटवर शेअर केला होता. मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स आणि विवेक रंगाचारी यांनी 800 या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: