72 Hoorain : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमानंतर आता '72 हुरैन' (72 Hoorain) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्रेनवॉश करुन निष्पाप लोकांना कसं दहशतवादी संघटनेत सामील करुन घेतलं जातं यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या सिनेमाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरही या सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे.
'72 हुरैन' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये निष्पाप लोकांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये कसं सामील केलं जातं हे पाहायला मिळत आहे. दहशतवादी संघटनेत सामील केल्यानंतर त्यांचा जीव घेतला होता. यात दहशतवादी म्हणत आहेत की,"जो व्यक्ती जीव देऊन लोकांच्या जाळ्यात अडकतो, त्याला जन्नतमध्ये जायला मिळते, असे दहशतवाद्यांचे मत आहे.".
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय दिग्दर्शक संजय पूरन सिंह (Sanjay Puran Singh) यांनी '72 हुरैन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. '72 हुरैन' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार '72 हुरैन'
'72 हुरैन' हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 72 तरुण मुलींचं ब्रेनवॉश करुन त्यांना कसं मारलं जातं हे पाहताना अंगावर शहारे येतात. '72 हुरैन' हा सिनेमा इंग्लिश, मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगली, पंजाबी, भोजपुरी, कश्मीरी आणि आसामी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'72 हुरैन'चा विषय गंभीर असल्यामुळे हा सिनेमा दहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या या सिनेमाची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं, निर्माते म्हणाले.
'72 हुरैन'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (72 Hoorain Starcast)
'72 हुरैन' या सिनेमात पवन मल्होत्रा आणि आमिर बख्शी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच राशिद नाज, अशोक पाठक आणि नटोतम बेन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 7 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अशोक पंडित म्हणाले,"एकीकडे '72 हुरैन' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत असताना सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला विरोध करणं हे चुकीचं आहे. हा प्रोपोगंडा सिनेमा नाही. कोणत्याही सिनेमावर सिनेमा बनवण्याचा आम्हाला अधिकार असायला हवा".
संबंधित बातम्या