3 Idiots Sequel:

  थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi),  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. करीनानं काही दिवसांपूर्वी  थ्री इडियट्स चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता बोमन इराणीनं या चित्रपटाबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


करीना कपूरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये करीना म्हणते, 'हे तिघे आमच्यापासून काही तरी लपवत आहेत. कदाचित हे सिक्वेलचा विचार करत आहेत. पण हा सिक्वेल माझ्याशिवाय कसा होऊ शकतो? मला याबद्दल बोमन इराणीसोबत बोलावं लागेल.' त्यानंतर आता बोमन इराणीनं थ्री इडियट्स चित्रपटाबाबत एक व्हिडीओ शेअर केला. 


व्हिडीओमध्ये बोमन म्हणतो, 'तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही व्हायरसशिवाय थ्री इडियट्सचा विचार कसे करु शकता? बरं झालं करीनानं मला सांगितलं. नाही तर मला हे कळालच नसतं. मला वाटलं होतं आपली मैत्री आहे? पण तुम्ही मला सांगितलं नाही. मला हे जावेद जाफरीला सांगावं लगेल.' या व्हिडीओला बोमननं कॅप्शन दिलं, 'ते व्हायरसशिवाय 3 इडियट्सचा सिक्वेल कसा बनवू शकतात? व्हायरस व्हिलन नहीं होगा तो कौन होगा, और क्या ही होगा?'   बोमन इराणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


बोमनच्या व्हिडीओला शर्मन जोशीनं कमेंट केली, 'सॉरी व्हायरस म्हणजे बोमन इराणी सर, तुम्ही चिडू नका. मी लवकरच सविस्तर सांगेन... प्लीज फोन उचला'


पाहा व्हिडीओ: 






थ्री इडियट्स या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक राजकुमार यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


महत्वाच्या इतर बातम्या:


R. Madhavan: 'थ्री-इडियट्स'साठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'त्याला ऑडिशन देण्याची गरज...'