Shah Rukh Khan : 'पठाण' चित्रपटातून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने चांगलंच कमबॅक केलंय. आज सोळाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर पठाणची जादू कायम आहे. पठाणने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे शाहरूख खान सध्या चर्चेत आहे. परंतु आता तो त्याच्या हातातील घड्याळामुळे देखील चर्चेत आलाय.  शाहरुखच्या घड्याळाने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु शाहरूखच्या घड्याळाची किंमत ऐकून अनेक जण थक्क होत आहेत.   


Shah Rukh Khan : किती आहे शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत? 


अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांचं लक्ष  जातंय ते शाहरुखच्या घड्याळाकडे. शाहरूखने ब्ल्यू  रंगाचे घड्याळ घातले आहे. या घड्याळ्याची किंमत  4.98 कोटी रुपये आहे. शाहरुखच्या घड्याळाची किंमत डाइट सब्याच्या अधिकृत इनस्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.


'पठाणच्या' सक्सेसनंतर शाहरुखचा नवा चित्रपट 'जवान' लवकरच चित्रपट गृहात येणार आहे. जवान या चित्रपटात साऊथ सुपरस्टार नयनतारा लीड रोल साकारत असून शाहरुख खान बरोबर या चित्रपटात विजय सेतुपती, प्रिया मणिक, सान्या मल्होत्रा अशी स्टार मंडळी दिसणार आहे. तामीळ चित्रपट निर्माते एटली कुमार यांनी 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शाहरुख खान जवान या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन 'डंकी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे . 'डंकी' या चित्रपटानिमीत्त शाहरुख खान पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करणार आहे.
 
सुरुवातीपासूनच पठाण वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावर बॉयकॉट अशी मोहीम देखील चालवण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडत 55 पठाणने कोटींचे कलेक्शन केले. आज देखील 'पठाण'च्या कमाईचा वेग थांबलेला नाही. एका रिपोर्टनुसार 'पठाण'ने रिलीजच्‍या 16 व्‍या दिवशी 6 कोटी रूपयांचा गल्ला कमावला आहे.  


अनेक विक्रम मोडले  


'पठाण'ने कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन आता साडेचीनशे कोटी पार झाले आहे.  'पठाण' चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.