Bollywood Movie Broke Sholay Movie Records: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) जेव्हा जेव्हा ब्लॉकबस्टर (Blockbuster Movie) चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा 'शोले' सिनेमाचं (Sholey Movie) नाव सर्वांच्या तोंडी असतंच. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, 44 वर्षांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यानं कमाईच्या बाबतीत 'शोले'ला जोरदार टक्कर दिली होती. या सिनेमानं फक्त 3 कोटींच्या बजेटमध्ये तब्बल 16 कोटींची कमाई केलेली. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? 

Continues below advertisement

बॉलिवूडच्या कल्ट सिनेमांची चर्चा होते, तेव्हा 'शोले'चं नाव सर्वात आधी येतं. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, 44 वर्षांपूर्वी एक सिनेमा होता, ज्यानं कमाईच्या बाबतीत 'शोले'ला जोरदार टक्कर दिली होती. बरं या सिनेमाची स्टारकास्टही तगडी होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, अभिनेत्री या सिनेमात एकत्र झळकल्या होत्या. या मल्टीस्टारर सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगत आहोत, त्याचं नाव 'क्रांती' (Kranti Movie). 1981 मध्ये रिलीज झालेल्या 'क्रांती' सिनेमानं त्या काळातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्सचा चक्काचूर केला होता. 'क्रांती'चे दिग्दर्शक मनोज कुमार यांनी केलेलं. यामध्ये बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट होती. दिलीप कुमार, शशी कपूर, मनोज कुमार, हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांसारखे सुपरस्टार 'क्रांती' सिनेमात झळकलेले. हा चित्रपट ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित होता. चित्रपटाची कथा, देशभक्तीपर संवाद आणि दमदार संगीतानं प्रेक्षकांची मनं जिंकलेली.

Continues below advertisement

'शोले'चाही विक्रम मोडला

असं म्हटलं जातं की, 'क्रांती' सिनेमाचं बजेट सुमारे 3 कोटी रुपये होतं, जे त्या काळातील इतर सिनेमांच्या तुलनेत खूपच होतं. म्हणजे, 'क्रांती' हा त्याकाळातील बिग बजेट सिनेमा होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 16 कोटी रुपये कमावलेले, जे त्या काळातील सर्वाधिक कलेक्शन मानलं जातं. या चित्रपटानं अमिताभ बच्चन, धर्मेंद्र स्टारर 'शोले' सिनेमालाही मागे टाकलं होतं. एवढंच नाहीतर देशभरात या सिनेमाची प्रचंड मोठी क्रेझ निर्माण झालेली. या चित्रपटानं केवळ आर्थिक यश मिळवलं नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही आपलं स्थान निर्माण केलं.

दिलीप कुमार यांचा हिट कमबॅक ठरलेला 'क्रांती'

काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर दिलीप कुमार यांच्या कमबॅकबाबत चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झालेली. कारण बऱ्याच काळानंतर हे त्यांचे मेगा बजेट चित्रपटात पुनरागमन होतं. आजही जेव्हा क्लासिक चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा 'क्रांती' नक्कीच आठवतो. हा चित्रपट आशय, स्टार पॉवर आणि देशभक्तीचा संगम बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे, 'क्रांती' सिनेमा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Life Story: वयाच्या सत्तरीत जगतोय लग्झरी लाईफ, 131 कोटींच्या बंगल्यात राहतो 'हा' सुपरस्टार; 21 वेळा जिंकलाय फिल्मफेयर अवॉर्ड