Bollywood Most Romantic Film: ओटीटीवर (OTT) अनेकदा असे अनेक सिनेमे आणि वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात, जे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अजिबात पाहू शकत नाही. या सीरिज आणि सिनेमे एकट्यानं पाहणंच चांगलं. कारण यामध्ये रोमॅन्टिक, इन्टिमेट सीरिजचा एवढा भडिमार असतो की, कुटुंबासोबत पाहताना तुम्हाला वारंवार नजर चुकवावी लागत असेल. आज आम्ही तुम्हाला 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच एका सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो एकट्यानंच सर्वात जास्त एन्जॉय करता येईल.

Continues below advertisement

जेव्हा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता, तेव्हाच याची खूप चर्चा रंगलेली. प्रत्येकाच्या ओठांवर याच सिनेमाचं नाव होतं. या चित्रपटात तीन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या आणि प्रत्येकजण त्याबद्दल बोलत होता. या चित्रपटानं प्रचंड चर्चा निर्माण केलेली. या सिनेमात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचं नाव 'गहराइयां' होतं. 'गहराइयां' ही एक अशी कथा आहे, जी आधुनिक नातेसंबंधांमधली गुंतागुंत आणि मानवी भावनांच्या खोलीचा सुंदरपणे शोध घेते.

शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात नातेसंबंध, प्रेम, विश्वासघात अशा अनेक पातळ्यांवर दाखवण्यात आला आहे. या कथेत मुख्य भूमिका असलेली आलिशा खन्ना (दीपिका पदुकोण) ही एक योगा प्रशिक्षक आहे, जी तिच्या कारकिर्दीत आणि रिलेशन या दोन्ही गोष्टींवर स्थिरावलेली वाटते.

Continues below advertisement

आलिशाचा प्रियकर, करण (धैर्य करवा) हा एक अयशस्वी लेखक आहे आणि त्याच्यासोबतचं तिचं नातं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एक दिवस, आलिशा तिची चुलत बहिण टिया (अनन्या पांडे)चा होणारा नवरा जैन (सिद्धांत चतुर्वेदी)ला भेटते आणि त्याचवेळी सिनेमाची कथा भावनिक वळण घेते.

आलिशा आणि जैन यांच्यात एक वेगळंच आकर्षण फुलतं, जे हळूहळू एका खोल, पण गुंतागुंतीच्या नात्यात विकसित होतं. दोघेही एकमेकांमधील त्यांच्या भूतकाळातील एकटेपणा आणि अपूर्णता भरून काढण्याचा प्रयत्न करतात, पण हे नातं त्यांना आणखी गुंतागुंतीकडे घेऊन जातं.  चित्रपटाचं सौंदर्य त्याच्या संवादांमधून आणि कॅमेरावर्कमधून प्रतिबिंबित होतं. शकुन बत्रानं नातेसंबंधांचे नाजूक थर अत्यंत संवेदनशीलतेनं चित्रित केलेत. दीपिकानं आलिशाचे पात्र इतक्या खोलवर आणि वेदनांनी साकारलंय की, प्रेक्षक तिच्या प्रत्येक भावना अनुभवू शकतात.

जैनच्या भूमिकेत सिद्धांत एका प्रौढ तरीही असुरक्षित व्यक्तीची भूमिका साकारतो, जी त्याच्या इच्छा आणि अपराधीपणामध्ये अडकलेली असते. टियाच्या भूमिकेत अनन्या पांडे सहजतेनं तिची निरागसता आणि वेदना साकारते. 2 तास 28 मिनिटांचा हा चित्रपट रोमँटिक आणि बोल्ड दृश्यांनी भरलेला आहे. हा चित्रपट अतिशय बोल्ड दृश्यांनी भरलेला आहे, ज्यामुळे तो कुटुंबाचा चित्रपट बनत नाही.

'गहराइयां' मधला दीपिकाचा लूक चित्रपटाला आणखीनच आकर्षक बनवतो. दरम्यान, अनन्या पांडे देखील खूपच हॉट आणि बोल्ड दिसते. सिद्धांत चतुर्वेदीसोबतची तिची केमिस्ट्री देखील चित्रपटात अद्भूत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2 तास 20 मिनिटांच्या या चित्रपटासमोर इम्रान हाश्मी, शक्ती कपूर सोडाच, वेब सिरीज सुद्धा फिकी पडेल! YouTube वर धुमाकूळ