Sajid Khan: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि बिग बॉस या  शोचा माजी स्पर्धक साजिद खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. दरम्यान, आता साजिद खानबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चित्रीकरणादरम्यान,  साजिदचा अपघात झाला आहे.  शनिवारी सेटवर हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे साजिदचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.  दुसऱ्या दिवशी तातडीने त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.  त्याच्यावर शस्त्रक्रिया  यशस्वीरित्या झाल्याची माहिती चित्रपट निर्माती फराह खान हिने दिली आहे. 

Continues below advertisement

Sajid Khan Health: साजिद खानची बहीण फराह खानने दिली अपघाताबाबत माहिती

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार,  साजिद खानची बहीण फराह खानने या अपघाताबाबत माहिती दिली. तिने सांगितले की, "रविवारी साजिदवर शस्त्रक्रिया पार पडली. ही  सर्जरी यशस्वी झाली. त्याची प्रकृती आता ठीक आहे. काळजी करण्यासारखे आता कारण नाही. तो बरा होत आहे", अशी माहिती फराह खान हिने दिली.  मिळालेल्या माहितीनुसार,  अपघाताच्या वेळी साजिद एकता कपूरच्या प्रॉडक्शनसाठी शूटिंग करत होता.

दीर्घ विश्रांतीनंर पुन्हा दिग्दर्शनात परतत होते

साजिद खान दीर्घ  विश्नांतीनंतर  दिग्दर्शनात परतण्याची तयारी करत आहे. त्याचा  शेवटचा चित्रपट हमशकल्स 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता.  2005साली अमिताभ बच्चन  आणि अर्जून रामपाल अभिनीत 'डरना मना  है' या हॉरर  चित्रपटातून त्याने पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला.  2007 मध्ये बेबी  या कॉमेडी चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली होती.  यानंतर 'हाऊसफूल ' आणि 'हाऊसफूल 2', हे चित्रपटही यशस्वी झाले. 

साजिद खान बऱ्याच कारणांमुळे चर्चेत

दरम्यान, साजिद खान 2022मध्ये  बिग बॉसमध्ये दिसला होता.  तो  काही वर्षांपूर्वी #Metooमुळेही चर्चेत आला होता. त्याच्यावर काही तरूणींनी आरोप केले होते.  दरम्यान, साजिदची बहीण फराह खान सध्या  यूट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे.  या यूट्यूब चॅनेलमध्ये काही स्वयंपाकाचे व्हिडिओ शेअर करते. ती काही सेलिब्रिटींच्या घरीही जाते. तिथेही स्वयंपाक करते. या व्हिडिओंमुळे तिचा कूक दिलीप देखील खूप प्रसिद्ध झाला आहे. फराह नेहमी दिलीपला सोबत घेऊन जाते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

चाहत्यांची तुडुंब गर्दी, एअरपोर्टवर येताच विजय थलपतीसोबत 'नको ते घडलं', सगळेच चक्रावले; VIDEO व्हायरल