Thalapathy Vijay Injured: तामिळ सुपरस्टार विजय थलापती यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी अनेक  हिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. थलापती यांचे अॅक्शन फिल्म आणि डायलॉग डिलिव्हरीवर प्रेक्षक फिदा आहे. विजय थलापती 2024 रोजी राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी 'तमिळगा वेत्री कळघम' या पक्षाचं  चिन्ह आणि झेंडा अधिकृतपणे लाँच केले.   विजय हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत.  दरम्यान, अभिनेत्यासोबत एक दुर्घटना घडली. काल सायंकाळी  विजय थलापती हे विमानतळावर कोसळला. चेन्नई विमानतळावरून जात असताना त्यांना चाहत्यांनी घेरलं. यावेळी विमानतळावरून कारपर्यंत जात असताना ते कोसळले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी कमेंट करून थलापतीच्या  तब्येतीची विचारपूस केली आहे. 

अभिनेता मलेशियाला गेला होता

थलापती विजय त्यांचा शेवटचा 'जन नायगन' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी मलेशियात गेले होते. या चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम काल मलेशियात पार पडला होता.   जिथे त्यांनी या चित्रपटानंतर अभिनयातून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केलं. विजय थलापती यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.   

28 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास थलापती विजय मलेशियाहून चेन्नईला परतले होते. अभिनेत्याने विमानतळावर पाय ठेवताच चाहत्यांचा जनसागर उसळला. बरेच फॅन्स विमानतळावर थलापती यांची वाट पाहत होते. मात्र, थलापती विमानतळावर येताच चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. पीटीआयच्या एक्स हँडलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओनुसार,  चेन्नई विमानतळावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. गार्ड थलापती विजय यांना गर्दीतून वाट काढून त्यांच्या कारपर्यंत घेऊन जात होते.  मात्र, कारजवळ पोहोचताच विजय थलापती खाली कोसळले.   दरम्यान, अंगरक्षकांनी त्यांना ताबडतोब उचलले तसेच कारमध्ये बसवले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानतळावर उभ्या असलेल्या अभिनेत्याच्या  कारचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत  आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त. नेटकऱ्यांनी चाहत्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

थलापती विजय यांचा शेवटचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

एच. विनोद दिग्दर्शित 'जन नायगन' हा विजय थलापती यांचा शेवटचा चित्रपट आहे.   या चित्रपटात बॉबी  देओल आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 9 जानेवारीला  सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.