Farah Khan Promises Salary Hike to Cook Dilip: चित्रपट दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) आणि तिचा कुक दिलीप सध्या त्यांच्या यूट्यूब (Farah Youtube) व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही दिग्गजांना भेट देत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारतात. तसेच विविध विषयांवर चर्चा करतात. व्लॉग तयार करण्यासाठी अभिनेत्री सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरच्या (Social Media Influencer) घरी जातात.  तसेच त्यांच्या आवडीचे डीश करतात. फराहच्या व्हिडीओंमध्ये एक कुक देखील पाहायला मिळतो. जो फराहसोबत फेमस झाला आहे.   दिलीप (Farah Cook Dilip) नेमका  आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहेत.  नेटकरी यूट्यूब व्हिडीओंच्या  कमेंट सेक्शनमध्ये  दिलीपचे कुटुंब आणि सॅलरीबाबत माहिती विचारतात.    

Continues below advertisement

दरम्यान, फराहनं दिलीपला 10  वर्षांपूर्वी 20 हजार रुपयांच्या पगारावर नोकरीवर ठेवून घेतलं होतं.  यानंतर त्याच्या पगारात वाढ होत गेली.   नुकतंच फराहनं दिलीपची सॅलरी वाढवून 50 हजार रुपये करणार असल्याचं वचन दिलं. यामुळे दिलीपला प्रचंड आनंद झाला आहे. फराह नुकतीच आपल्या व्लॉगसाठी  जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाच्या घरी गेली होती.  कृष्णा तिथे तिचा भाऊ टायगर आणि आई वडील जॅकी श्रॉफ आणि आयेशा यांच्यासोबत राहते.  यावेळी फराहने कृष्णाच्या हिंदीची खिल्ली उडवली होती. यावेळी वडील जॅकी श्रॉफ कृष्णाच्या मदतीला धावून गेले होते. यावेळी फराह  दिलीपच्या सॅलरीवरही चर्चा करते. तसेच दिलीपची सॅलरी वाढवण्यावरही भाष्य करते. 

फराह दिलीपची सॅलरी वाढवणार (Farah Khan Cook Dilip)

 

Continues below advertisement

कृष्णा श्रॉफच्या घरी जाण्यापूर्वी फराहने दिलीपला, कृष्णाविषयी माहिती दिली. 'कृष्णा खूप सुंदर आहे. ती जॅकी श्रॉफची मुलगी आहे.  कृष्णा नुकतीच द 50 या शोमध्ये दिसली होती.  आता मी तुझी सॅलरी  वाढवून 50 हजार करेन', असं फराह दिलीपला म्हणाली.   हे ऐकून दिलीपला प्रचंड आनंद झाला. तेव्हा दिलीप, 'माझा पगार वाढवून खरंच 50 हजार होईल?' असं फराहला म्हणतो. हे ऐकून फराह, 'नोकराच्या अपेक्षा', असं म्हणते.

यानंतर दिलीप  आणि फराह दोघेही कृष्णाच्या घरी गेले.  कृष्णा श्रॉफने फराह आणि दिलीपचे घरात स्वागत केले. यानंतर जॅकी श्रॉफ देखील आला.   यावेळेस फराहने जॅकीला कृ्ष्णाच्या हिंदीबद्दल विचारले. 'तुम्ही कृष्णाला हिंदी का नाही शिकवले?', असं फराह दिलीपला म्हणाली.  तेव्हा जॅकी, 'तिची स्टाईल, माझी स्टाईल.. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. ती हिंदी समजून घेते,  एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे.  भाषेबद्दल बोलायचं झाल्यास, ती भाषा  मधूर असणे गरजेचं आहे', असं कृष्णाचे वडील जॅकी श्रॉफ म्हणाले.

फराहसोबत असणारा दिलीप आहे तरी कोण? (Farak Khan Cook Salary Hike)

दिलीपने एका व्लॉगमध्ये सांगितले होते की,  तो जेव्हा दिल्लीमध्ये आला होता, तेव्हा त्याचा पगार 300 रुपये होता. त्यानंतर दिलीप फराह खानकडे कामाला लागला.  दिलीप फराहला अजय आणि काजोलच्या बंगल्याबाहेर भेटला. दिलीपचा भाऊ भोला अजय देवगनकडे कुक म्हणून होता. यावेळेस फराहनं दिलीपला 20 हजाराच्या पगारावर नोकरीवर ठेवले. यानंतर  दिलीपचा पगार वाढत गेला. तसेच फराह दिलीपला आपल्या यूट्यूब चॅनेलमधून होणाऱ्या कमाईचे काही वाटाही देते.  खरंतर दिलीपचे कुटुंब हे बिहार येथील दरभंगा गावचे रहिवासी आहेत.