Bollywood Actress Life Story: दूरदर्शनच्या काळातील काही जाहिराती (Advertisements) आजही आठवतात, काही जाहिरातींची गाणी, नावं किंवा त्यातल्या काही पंच लाईन्स आजही अनेकांच्या तोंडी आहेत. निरमाची जाहिरात आजही तोंडपाठ आहेत. तशीच आणखी एक जाहिरात नव्वदच्या दशकात गाजलेली. अशीच एक जाहिरात एका साबणाची होती. या जाहिरातीत एक सुपरस्टार अभिनेत्री होती. पण, त्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. नव्वदच्या दशकात पिअर्स साबणाची एक जाहिरात होती, जी कदाचित तुमच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू घेऊन येईल. त्या जाहिरातीत एक गोंडस चिमुकली झळकली आहे. तुम्ही सांगू शकाल का? ती चिमुकली कोण? पिअर्स साबणाच्या जाहिरातीत झळकलेली ती चिमुकली  म्हणजे, बॉलिवूडची सुपरस्टार (Bollywood Superstar) अभिनेत्री (Actress) होती. जिची एक झलक पाहण्यासाठी कित्येक तरुण व्याकूळ व्हायचे. आज तिची सावत्र बहीण इंडस्ट्रीवर राज्य करतेय. 

Continues below advertisement

90 च्या दशकातील फ्लॅशबॅक नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटनं एक जुनी जाहिरात शेअर केली आहे. ही जाहिरात पिअर्स साबणाची आहे. जाहिरातीत एक गोंडस लहान मुलगी दिसते, जी आरशासमोर उभी राहून मेकअप करताना दिसतेय. त्यानंतर ती गोडुली साबणाने आंघोळ करते. ती आपल्या बोबड्या स्वरात अत्यंत निरागसपणे म्हणते की, या साबणानं आंघोळ केल्यानं ती तिच्या आईइतकीच सुंदर दिसेल. तिचे गोंडस हावभाव, तिचे बोबडे बोल यामुळे आपल्या चेहऱ्यावर आपसूकच हसू येतं. तिच्यावरुन आपली नजर हटतच नाही. ही गोड गोडुली, चिमुकली म्हणजे, एकेकाळची सुपरस्टार अभिनेत्री पूजा भट्ट. तिनं तिच्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत एक खास छाप पाडली आहे आणि ती एक शक्तिशाली दिग्दर्शक आणि निर्माती देखील आहे.  

क्यूटनेसवर फिदा झालेत फॅन्स 

पिअर्स साबणाची ही जुनी अॅड पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. पूजा भट्टच्या क्युटनेसवर त्यांच्या नजरा तर खिळल्यात. पण, त्यासोबतच तिचं कौतुकंही केलं जातंय. एका फॅननं लिहिलंय की, "पूजा भट्टची स्माईल फार क्युट वाटतेय..." काही फॅन्स 90च्या दशकातील मेलोडीमध्ये गुंतलेले आहेत, जे त्या काळातल्या जाहिराती आणि जिंगल्सचं कौतुक करतात. दरम्यान, पूजा भट्ट म्हणजे, हिंदी सिनेसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि आलिया भट्ट यांची मोठी बहीण आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rahul Gandhi On Brazilian Model: भारतात 22 वेळा मतदान करणारी 'ती' ब्राझीलियन मॉडेल कोण? राहुल गांधींचा स्फोटक दावा, आरोपांची राळ उठवली