Amruta Khanvilkar : आपल्या सौंदर्य आणि मनमोहक अदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या (Colors TV) 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Ja) या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून अमृता आपल्या नृत्याने परीक्षकांनाही भुरळ घातली आहे. झलक दिखला जा च्या आगामी भागात अमृता नोरा फतेही बरोबर 'वाजले की बारा' या गाण्यावर ठुमके मारताना दिसणार आहे.
कलर्स वाहिनीवरील झलक दिखला जा हा शो सध्या अव्वल क्रमांकावर आहे. या शो मध्ये अभिनेत्री माधुरी दिक्षित (Madhuri Dixit), दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. तर, मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर स्पर्धक म्हणून या शोमध्ये दिसतेय. या शो मध्ये अमृताने आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या तालावर चाहत्यांना पार वेडं तर केलंच आहे. ‘झलक दिखला जा’च्या एका भागात अमृताने लावणी सादर केली. अमृताचा डान्स पाहून नोरालाही लावणीचा मोह आवरता आला नाही. नोराने अमृतासह लावणीच्या तालावर ठेका धरला. ‘वाजले की बारा’गाण्यावर अमृता-नोराने ठसकेबाज लावणी सादर केली.
अमृता खानविलकरने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम (Instagram)अकाऊंटवरून शेअर केला आहे. आणि पोस्टमध्ये म्हटलं आहे, "लावणी करायलाच लावली या पोरी ला". या पोस्टवर चाहत्यांच्या देखील भरभरून कमेंट्स आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :
या व्हिडीओमध्ये अमृताने हिरव्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तर, नोरा फतेहीने देखील हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. या दोघीही खूप सुंदर दिसत होत्या.
काही दिवसांपूर्वी अमृताने 'डोला रे डोला' या गाण्यावर नृत्य सादर केले होते. या गाण्यावर अमृताने दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षितबरोबर देखील नृत्य सादर केले. आता आगामी भागात अमृता नोरा बरोबर ठुमके मारताना दिसणार आहे. त्यामुळे एकंदरीतच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :