Actress Laila Khans Heartbreaking Story: बॉलिवूडमध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. नाव, पैसा कमावण्याचं स्वप्न उराशी घेऊन लाखो लोक मायानगरीत येतात. काहींना यश मिळतं. काहींना अपयश पदरात घेऊन पुढे जावं लागतं. ग्लॅमरची दुनिया जितकी हवीहवीशी वाटते, तितकंच पडद्यामागचं वास्तव खूप वेगळं असतं. अशीच एका अभिनेत्रीच्या आयुष्यातील कथा खूप भयानक आहे. आपल्याच सावत्र वडिलांनी हत्या करून जमिनीत पुरलं. ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना लैला खान या अभिनेत्रीसोबत घडली. तब्बल 11 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. इगतपूरी येथील त्यांच्या बंगल्यात मृतदेहाचे सांगाडे सापडले होते. सावत्र वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला संपवलं होतं.
अभिनेत्री लैला खान वफा: अ डेडली लव्ह स्टोरीमध्ये दिसली होती. या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात लैला खान आणि राजेश खन्ना यांचे अनेक इंटिमेट सीन्स होते. लैला खानने या चित्रपटानंतर बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं. तिनं मुनीर खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
नेमकं काय घडलं?
2011 साली खान परिवारी इगतपूरी येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान, लैला पाटील आई सेलिना पटेल आणि चार भावंडांसह बेपत्ता झाली. लैलाचे सावत्र वडील परवेझ टाकने खान कुटुंबाची निर्घृण हत्या केली. हत्येमागचं कारण परवेझला लैलाच्या आईचा पहिला पती शेख आवडत नव्हता. असंही म्हटलं जातं की, परवेझला लैलाचं सिनेमांमध्ये काम करणं आवडत नव्हतं.
लैलाच्या कुटुंबाने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. परवेझला एकटं वाटलं होतं. याच कारणास्तव लैला, तिची आई आणि लैलाच्या भावंडांना ठार केलं असल्याची माहिती एका वृत्तातून समोर आली. लैला आपल्या कुटुंबासह इगतपूरी येथे सुट्टीसाठी गेले होते. इथेच सर्वांची हत्या करण्यात आली. परवेझने त्यांची हत्या करून मृतदेह खड्ड्यात पुरले. यानंतर लैलाचे वडील आणि सेलिनाचे पहिले पती नादिर पटेल यांनी खान कुटुंबाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली. तपासात संशयाची सुई परवेझकडे फिरली. जम्मू काश्मीर पोलिसांनी परवेझला अटक केली. नंतर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं.
आरोपीनं पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी परवेझचं लैलाच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. शेखशी सेलिनाशी होणारी वाढती जवळीक आवडत नव्हती, शेखचा कुटुंबाशी संपर्क टाकला आवडत नव्हतं, याच कारणास्तव सर्वांना ठार मारलं, असं त्यानं स्पष्ट केलं. सरकारी वकिलांनी टाकविरूद्ध साक्षीदारांची चौकशी केली. तसेच कुजलेले मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली. 2011 साली घडलेल्या या घटनेनंतर सिनेजगतात खळबळ उडाली होती.