Cricket in Iceland on Vaibhav Suryavanshi : भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने क्रिकेटच्या मैदानावर असा पराक्रम केला आहे, ज्याची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात वैभवने इंग्लंडविरुद्ध फक्त 80 चेंडूत 175 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि अनेक मोठे विक्रमही मोडीत काढले.
"वैभवला अटक करा...", आइसलँड क्रिकेट बोर्डाची पोस्ट व्हायरल
वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता, ते पाहून सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले. यात नेहमीच आपल्या मिश्किल पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या 'आइसलँड क्रिकेट' (Cricket in Iceland) च्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैभवच्या फटकेबाजीवर कमेंट करताना त्यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट करत लिहिले की, "वैभव सूर्यवंशीला आत्ताच्या आत्ता अटक करा... इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध मैदानावर सुरू असलेला हा हिंसाचार 'X-rated' आहे." आइसलँड क्रिकेटची ही मजेशीर पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
ट्रॅव्हिस हेडचा विक्रम मोडला
वैभवची ही खेळी कोणत्याही आयसीसी (ICC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील (पुरुष, महिला आणि सर्व वयोगटातील) आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर होता. हेडने 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम सामन्यात 163 चेंडूत 174 धावा केल्या होत्या. वैभवने केवळ 14 वर्षांचा असताना हा ऐतिहासिक टप्पा ओलांडून क्रिकेट विश्वाला चकित केले आहे.
द्विशतक हुकलं, तरीही असमाधान
स्पर्धेची सुरुवात वैभवसाठी सोपी नव्हती. अमेरिकेविरुद्ध तो केवळ 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर तीन अर्धशतके आणि दोन 30+ धावांच्या खेळी जरूर केल्या, पण शतकापर्यंत पोहोचता आलं नाही. मात्र फायनलमध्ये भारतासारखीच अपराजित असलेल्या इंग्लंडविरुद्ध वैभवने आपला खेळ पूर्णपणे नव्या उंचीवर नेऊन ठेवला. फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी दुहेरी शतकाच्या दिशेने झेपावत होता, पण स्लोअर बॉलवर विकेटकीपरकडे झेल देत बाद झाला.
हे ही वाचा -
