Tamannaah Bhatia Becomes Highest-Paid Performer: 'आज की रात' (Aaj ki raat) या गाण्यातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamanna Bhatia) चाहतावर्ग खूप मोठा आहे. चित्रपटापेक्षा ती सध्या आयटम साँगमुळे (Item Songs) चर्चेत आली आहे. जेलर चित्रपटातील कावाला असो किंवा, द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधील गाफूर. या गाण्यांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान, प्रसिद्धीमुळे तिची आयटम साँग साईन करण्यासाठी डिमांडही वाढली. सध्या प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्रीनं तिचं मानधनसुद्धा वाढवलं आहे. आयटम साँग व्यतिरिक्त अभिनेत्री अनेक कार्यक्रमात डान्स देखील सादर करते. अलिकडेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तमन्नाचा डान्स ठेवण्यात आला होता. या डान्ससाठी तिनं आयोजकांकडून तगडी मानधन आकारली आहे. फक्त 6 मिनिटांच्या डान्ससाठी तिनं ६ कोटी मानधन घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
तमन्नाने 6 मिनिटांसाठी किती रूपये आकारले?
गोव्यात न्यू इअर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बागा बीच येथील लास ओलास बीच क्लबमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात तमन्ना भाटियाने आयटम साँग सादर केला होता. या कार्यक्रमातील तिचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिचा परफॉर्मन्स धमारेदार ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये तिनं साधारण 6 मिनिटांसाठी स्टेजवर परफॉर्म केला. परंतु, 6 मिनिटांच्या परफॉ़र्मन्ससाठी तिनं तब्बल ६ कोटी आकारले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी तिनं खास अभिनेत्री सोनम बाजवासोबत स्क्रीन शेअर केली होती.
तमन्ना भाटियासोबत सोनम बाजवाही थिरकली
या कार्यक्रमात तिचं लोकप्रिय गाणं आज की रात या गाण्यावर दमदार नृत्य केले होते. या कार्यक्रमात तिनं एक मिनिटासाठी एक कोटी आकारले होते. म्हणजेच तिनं 6 मिनिटांसाठी 6 कोटी फी घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. तिनं सर्वात मोठी रक्कम आकारल्यामुळे तमन्नाची सध्या सिनेसृष्टीत चर्चा आहे. या कार्यक्रमात तमन्ना भाटियासोबत सोनम बाजवा आणि मिलिंद गाबानेही परफॉर्म केला होता. सध्या या कार्यक्रमातील व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: