Bollywood Actor Struggle: आज आम्ही तुम्हाला एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहोत. ज्या वयात मुलं खेळतात, बागडतात, त्या वयात त्याच्या कोवळ्या खांद्यांवर कुटुंबाची जबाबदारी आली. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यानं मिळेल ते काम करायला सुरुवात केली. एकदा तर नियतीनं त्याच्यासमोर हादरवणारी परिस्थिती आणून ठेवली होती. एकीकडे त्याच्या वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याची वाट पाहत होता. तर, दुसरीकडे रडण्याऐवजी आणि अंत्यसंस्कारासाठी जाण्याऐवजी त्याला नाटकात काम करणं भाग पडलं. याबाबत सांगताना मजबुरी होती, एवढंच हा अभिनेता म्हणतो.
आज फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये समाविष्ठ होणारा हा मराठमोळा अभिनेता, महिन्याला 35 रुपये पगाराची नोकरी करायचा. पण, आज त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये प्रतिष्ठेचं स्थान मिळवलं आहे. देशातील प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव गणलं जातं. जेव्हा वडिलांचं निधन झालं, त्यावेळी हा अभिनेता अवघा 28 वर्षांचा होता. तुम्ही ओळखलं का कोण?
घरात अठरा विश्व दारिद्र्य, जवळच्यांनीच वडिलांना दिला दगा...
आम्ही ज्या मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्यांचं नाव नाना पाटेकर. आज त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. 47 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नाना पाटेकरांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा गावात झाला. नानांचे वडील कापड रंगकामाचा एक छोटासा व्यवसाय चालवत होते. पण या व्यवसायात वडिलांचा त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं विश्वासघात केला आणि त्यांचं मोठं नुकसान झालं. एका जवळच्या मित्रानं नाना पाटेकर यांच्या वडिलांची मालमत्ता आणि पैसेही हिसकावून घेतले. यामुळे वडील खूप दुःखी झाले आणि आजारी पडू लागले. तेव्हा नाना पाटेकर 13 वर्षांचे होते.
13व्या वर्षी स्विकारली कुटुंबाची जबाबदारी
कुटुंब आणि वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नानांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत बोलताना नाना पाटेकरांनी सांगितलं होतं की, ते फिल्म्सचे पोस्टर कलर करण्यासाठी चुनाभट्टीला जायचे. रंगकाम करून ते महिन्याला 35 रुपये कमवत होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी झेब्रा क्रॉसिंग देखील रंगवलीत, ज्याबद्दल त्यांनी काही काळापूर्वी 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ही भाष्य केलं होतं. नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं की, त्यांचे वडील गरिबी आणि दुःखानं इतके त्रस्त होते की, हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांच्या मृत्यूची बातमी आली, दुसरीकडे नाना नाटकाचा प्रयोग करत होते
नाना पाटेकरांनी 'नवभारत टाईम्स'शी बोलताना सांगितलं की, ज्यावेळी वडिलांच्या मृत्यूची बातमी समोर आली, त्यावेळी त्यांचा नाटकाचा प्रयोग सुरू होता. तिथे वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत होता आणि दुसरीकडे दुःखात रडण्याऐवजी नाना पाटेकर नाटकाचा प्रयोग संपवत होते. नानांनी सांगितलं होतं की, त्यावेळी ते 'महासागर' नावाच्या प्लेमध्ये काम करत होते. वडिलांच्या निधनानंतर शो कॅन्सल करण्याबाबत चर्चा झाली. पण नानांनी विचार केला की, आपल्या दुःखात इतरांना दुःखी नाही करू शकत आणि त्यामुळेच शो सुरू ठेवला पाहिजे.
नाटकांमध्ये जीव ओतून काम केलं, पण 10 वर्षांनी नशीब पालटलं
नाना पाटेकरांच्या करिअरबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी 1978 मध्ये फिल्म 'गमन'मधून अॅक्टिंग डेब्यू केला होता. पण, अनेक वर्ष त्यांचा स्ट्रगल सुरू होता. डेब्यूच्या 10 वर्षांनी नाना पाटेकरांना 1988 मध्ये आलेली फिल्म 'सलाम बॉम्बे'मधून ओळख मिळाली. त्यानंतर ते 'परिंदा'मध्ये दिसून आले. ज्यामध्ये नानांनी साकारलेल्या गँगस्टरच्या रोलसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.
नाना पाटेकरांनी कारगिल युद्धात लढण्यासाठी सोडलेली अॅक्टिंग
नाना पाटेकर अजूनही अभिनयात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सक्रीय आहेत. ते लवकरच 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 रुपये दरमहा पगारानं सुरुवात करणारे नाना आज 80 कोटी रुपयांच्या नेटवर्थचे मालक आहेत. दरम्यान, त्यांनी कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी अभिनयही सोडला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :