Actress Life : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) माही गिलनं (Mahie Gill) अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला आपल्या बोल्ड आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखलं जातं. माहीला खरी ओळख देव डी चित्रपटातून मिळाली. या चित्रपटानंतर माहीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. ती तिच्या उत्कृष्ट कामांसाठी ओळखली जाते. यासोबतच माही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. माही गिलनं वयाच्या 17व्या वर्षी पहिल्यांदा आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर मात्र, तिनं त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माहीनं दुसऱ्यांदा लग्न केलं आणि आता तिला एक गोंडस मुलगी देखील आहे.
वयाच्या 17व्या वर्षी माहीनं बांधली लग्नगाठ
माही गिलनं 2012 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी नात्यात सातत्यानं खटके उडत होते. काहीच उरलं नव्हतं, त्यामुळे माहीनं आपल्या पहिल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिनं असंही सांगितलेलं की, तिच्या अयशस्वी लग्नाचं कारण म्हणजे, तिचा बालिशपणा... त्यावेळी ती खूपच लहान आणि इमॅच्योर होती.
लग्नापूर्वीच दिला मुलीला जन्म
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज'च्या प्रमोशन दरम्यान माहीनं नवभारत टाईम्सला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं की, ती सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहाते आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे. माहीनं म्हटलं होतं की, मला फार गर्व आहे की, मी एका मुलीची आई आहे. मी अजुनही लग्न केलेलं नाही, जेव्हा मला लग्न करावसं वाटेल, त्यावेळी मी लग्न करिन, असंही माही गिल त्यावेळी म्हणाली होती.
माझ्या मुलीचं नाव वेरोनिका आहे. ती माझ्यासोबतच राहाते. माझा एक बॉयफ्रेंड आहे. तो कॅथलिक नाही, बिझनेसमन आहे. 2019 मध्ये माही गिलला रवि केसरसोबत पाहिलं गेलं होतं आणि त्यावेळी दोघांच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत सुरू झाल्या होत्या. दरम्यान, 2023 मध्ये माही गिलनं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत रवि केसरसोबत तिनं आपली लग्नगाठ बांधल्याचं जाहीर केलं होतं.
लष्करातली नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं
माहीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, चेन्नईमध्ये पॅरा सेलिंग ट्रेनिंग दरम्यान तिचा अपघात झाला. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा तिनं पॅरा जंप केला, तेव्हा फ्रीफॉल झाला. या अपघातात माही अगदी मृत्यूच्या दाढेतून परत आली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या अपघाताची बातमी ऐकून तिचे कुटुंबीय खूप घाबरले आणि त्यामुळे तिला घरी परतावं लागलं. यानंतर माहीनं लष्कराची नोकरी सोडली. अभिनय कारकिर्दीबाबत माही गिलनं सांगितलं की, तिला अभिनयात कधीच रस नव्हता. चित्रपटात काम करण्याचा विचारही त्यांनी केला नव्हता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लष्कराची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं; जाणून घ्या, एका अपघातामुळं कसं आयुष्य पालटलं?