Sidharth malhotra and kiara advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra ) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) यांच्या घरी एका लहान परीचे आगमन झाले आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघेही पालक झाले आहेत. दोघांनी 2023 मध्ये लग्न केले होते. सिद्धार्थ आणि कियाराची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनीही त्यांच्या सर्व चाहत्यांना दोघेही पालक होण्यासंदर्भातील माहिती दिली होती.
28 फेब्रुवारी रोजी आपण गरोदर असल्याचे सांगत कियाराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघांनीही हातात बाळाचे मोजे धरले होते. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे. आता तो दिवस आला आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते लग्न
सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न सुमारे अडीच वर्षांपूर्वी झाले होते. दोघांचे लग्न 7 फेब्रुवारी 2023 रोजी झाले. 2021 मध्ये 'शेरशाह' नावाचा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. असे म्हटले जाते की दोघांची प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाली होती. या चित्रपटात प्रेषकांना देखील दोघांची जोडी खूप आवडली होती. त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी लग्न केले. आता दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर लोक दोघांचेही अभिनंदन करत आहेत.
गरोदरपणासाठी कियाराने सोडला मोठा चित्रपट
कियारा अडवाणी लवकरच हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी एक मोठा चित्रपट होता. तो म्हणजे फरहान अख्तरचा 'डॉन 3'. त्यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे आणि कियारा त्याच्यासोबत होती. पण गरोदरपणामुळे कियाराने हा चित्रपट सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'डॉन 3' मध्ये कियाराची जागा कृती सेननने घेतली आहे.
एका मुलाखतीत कियारा अडवाणीला तुला ट्विन्स झाली तर दोघेही मुलं असावीत की मुली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 'मला फक्त दोन स्वस्थ मुलं हवी आहेत,' असं उत्तर दिलं होतं. या उत्तरानंतर करिना कपूरने कियाराशी मस्करी केली होती. त्यानंतर मला एक मुलगा हवा आहे आणि एक मुलगी हवी आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या: