Bollywood Actor Shammi Kapoor Love Story: बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचा मुलगा शम्मी कपूर (Shammi Kapoor) म्हणजे, सुपरस्टार. बॉलिवूडचा एक काळ त्यांनी गाजवून सोडला. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या डान्स स्टाईलनंही अनेकांची मनं जिंकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेले. 

Continues below advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Industry) 'एल्विस प्रेस्ली' (Elvis Presley) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शम्मी कपूर यांची 21 ऑक्टोबर 2025, आज 94 वी जयंती. 'तुमसा नहीं देखा', 'दिल देके देखो', 'जंगली', 'काश्मीर की कली', 'तीसरी मंझिल' आणि 'अंदाज' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनयानं आणि क्लासी डान्स स्टाईलनं त्यांनी कित्येकांची मनं जिंकली. शम्मी कपूर यांनी शिक्षण सोडलं, ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली आणि नंतर एका अभिनेत्रीशी लग्न केलं, जिनं शम्मी कपूर यांचे भाऊ 'राज कपूर' यांच्या 'बावरे नैन' सिनेमात काम केलेलं. 

शिक्षण सोडलं, थिएटरपासून सुरू केली फिल्मी क्षेत्रातली कारकिर्द 

शम्मी कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब कोलकात्याला गेलेलं, जिथे ते तब्बल 7 ते 8 वर्ष राहिले. 1944 मध्ये मुंबईत आल्यानंतर, पृथ्वीराज कपूर यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. त्यावेळी 13 वर्षांच्या शम्मीनं थिएटरच्या 'शकुंतला' नाटकात भरतची भूमिका केली होती, ज्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. नंतर त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण शम्मी कपूर यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. अखेर, त्यांनी कॉलेज सोडलं आणि वडिलांच्या आग्रहावरून ते पृथ्वी थिएटरमध्ये परतले. तिथे ते 50 रुपये पगारावर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचे.

Continues below advertisement

गीता बालीसोबत फिल्मी अंदाजात बांधलेली लग्नगाठ

'कॉफी हाऊस' (1957) या चित्रपटाच्या शुटिंगवेळी शम्मी कपूर यांची भेट त्यांचा मित्र आणि दिग्दर्शक हरी वालिया यांच्यामार्फत झाली. नंतर, 'रंगीन रातें' (1956) मध्ये गीताची छोटीशी भूमिका असताना ते त्यांच्या प्रेमात पडले. शम्मी कपूर यांनी गीता बालीशी लग्न करण्याचं मनाशी पक्क केलं. गीतानं सुरुवातीला शम्मी कपूर यांचा प्रस्ताव टाळला, पण तीन महिन्यांनंतर, 23 ऑगस्ट 1955 च्या संध्याकाळी, तिनं लग्नाला होकार दिला, पण त्यासोबत एक अट घातली. लग्न आजच रात्री करायचं, असा प्रस्ताव गीता बालीनं ठेवला. आज रात्री लग्न झालं नाही, तर सगळं विसरुन जायचं, असंही ठणकावून सांगितलेलं. 

शम्मी कपूर यांनी ताबडतोब हरी वालियाला फोन केला. तिथून तिघेही मंदिरात गेले, पण पुजाऱ्यानं त्यांना सांगितलं की, आता मंदिर बंद झालंय. दुसऱ्या दिवशी पहाटे 24 ऑगस्ट 1955 रोजी पहाटे पुजाऱ्यानं मंदिर उघडलं आणि शम्मी कपूर, गीता बालीनं आयुष्यभरासाठी आपली लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नावेळी घडलेली आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, लग्नावेळी कुंकूच नव्हतं, मग त्यावेळी गीता बालीनं पर्समधून लिपस्टिक काढली आणि शम्मी कपूर यांना दिली. शम्मी कपूर यांनी त्यांच्या भांगात ती लिपस्टिक भरली आणि आयुष्यभरासाठी गीता बाली यांच्यासोबत गाठ बांधली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tollywood Actor Strugle Life: 300 सिनेमे करणारा सुपरस्टार, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही आयुष्य संपवलं; पोटच्या मुलांना डावलून मोलकरणीला दिली सर्व संपत्ती