Tollywood Actor Strugle Life: सिनेसृष्टीचं जग जेवढं चमचमतं दिसतं, तेवढीच त्याची दुसरी बाजू काळ्याकुट्ट अंधाराखाली झाकलेली आहे. संपूर्ण इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी मोठं यश मिळवलं आहे. तसेच, प्रसिद्धीही मिळवली आहे. पण, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही वैयक्तिक आयुष्यात मात्र असंख्य अडचणींचा सामना अनेक स्टार्सना करावा लागतो. आम्ही अशाच एका अभिनेत्याबाबत सांगणार आहोत. जो सुपरस्टार होण्यापूर्वी रेल्वे तिकीट कलेक्टर होता. पण, सिनेमांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला मोठं यश मिळालं. त्यानं 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. भरपूर पैसे कमावले, पण जग सोडताना आयुष्यभराची कमाई पोटच्या मुलांच्या नाहीतर मोलकरणीच्या नावावर करुन गेला. पण, त्याच्या नशीबी अत्यंत वेदनादायी मृत्यू आला. 

Continues below advertisement

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय त्याचं नाव रंगनाथ. तेलुगु सिनेमातलं सुप्रसिद्ध नाव. यांचं खरं नव तिरुमाला सुंदर श्री रंगनाथ. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात भारतीय रेल्वेमधून केली. सुरुवातीला ते तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचे. दरम्यान, लहानपणपासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी रेल्वेची नोकरी सोडून अभिनय जगतात पाऊल ठेवलं. 

70च्या दशकातला सुपरस्टार, जो पूर्वी होता रेल्वे तिकीट कलेक्टर 

रंगनाथनं फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्यांचा पहिला सिनेमा 1974 मध्ये आलेला, ज्याचं नाव चंदना' होतं. यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारलेली. फार कमी वेळातच ते 70 च्या दशकातले प्रसिद्ध तेलुगु सुपरस्टार बनले. यामध्ये 'मनमधुडू', 'निजाम', 'आदवी रामुडू', 'देवराय' आणि 'गोपाल'सारखे चित्रपट समाविष्ट आहेत. रंगनाथ यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलंय.

Continues below advertisement

व्हिलनच्या भूमिकांसह 300 हून अधिक चित्रपट

रंगनाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं, त्यांनी हिरोपासून ते सपोर्टिंग अॅक्टर्सपर्यंत आणि अगदी विलन भूमिका देखील केल्या. तेलुगू व्यतिरिक्त, त्यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. रंगनाथ यांच्या कारकिर्दीत सर्व काही ठीक चाललं होतं. त्यांनी बरीच संपत्ती जमवली, परंतु काय झालं कुणालाच कळलं नाही, पण एक दिवस त्यांनी राहत्या घराच्या किचनमध्ये आयुष्य संपवलं.                                        

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aamir Khan Rang De Basanti Alice Patten: 'रंग दे बसंती'मधली 'सू' आठवतेय का? रियल लाईफमध्ये ब्रिटिश गव्हर्नरची लेक; 19 वर्षांनंतरही कमाल दिसतेय...