Bollywood Actor Ranveer Singh: बॉलिवूडचा (Bollywood) असा स्टार जो आजही त्याच्या एनर्जी, उत्साह आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो, त्याचं नाव रणवीर सिंह (Ranveer Singh). सध्या रणवीर त्याचा आगामी सिनेमा धुरंधरमुळे (Dhurandhar Movie) चर्चेत आहे. तो नेहमीच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर उघडपणे बोलताना दिसला आहे आणि अनेकवेळा त्यानं अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सध्या त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आबे. ज्यामध्ये त्यानं त्याच्या पर्सनल लाईफबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. 

रणवीर सिंह (Bollywood Actor Ranveer Singh) जेवढा त्याच्या एनर्जेटिक फरफॉर्मन्ससाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या क्लासी अभिनयासाठीही ओळखला जातो. 2014 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यानं सांगितलं होतं की, त्यानं फक्त वयाच्या बाराव्या वर्षी त्याची वर्जिनिटी गमावलेली. त्यानं मुलाखतीत केलेलं हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानं सांगितलेलं की, तो लहानपणापासून याबाबत खूप मोकळ्या विचारांचा होता आणि हे सर्व त्याच्यासाठी 'नॅच्युरल प्रोसेस' होती.  

कंडोम नेहमी खिशात ठेवायचा 

मुलाखतीत पुढे बोलताना रणवीरनं असंही सांगितलेलं की, तो नेहमीच खिशात कंडोम ठेवतो. याबाबत पुढे स्पष्टीकरण देताना तो म्हणालेला की, सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणं फार महत्त्वाचं आहे आणि ही आपल्यापैकी प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. तसेच, रणवीरनं यावेळी आपल्या कॉलेज डेजबाबतही माहिती दिलेली. त्यानं सांगितलेलं की, कॉलेजमध्ये असल्यापासूनच मुली त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायच्या. एवढंच नाहीतर अभिनेत्यानं सांगितलेलं की, मुलीच नाहीतर मुलंही त्याला मेजेस करायची आणि त्याचा पाठलाग करायची, याची त्याला अनेकदा लाज वाटायची . 

'वन नाईट स्टँड'बाबत काय म्हणाला रणवीर? 

करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये रणवीर सिंहनं स्पष्टपणे कबुल केलेलं की, त्यानं एकापेक्षा जास्त वेळा 'वन नाईट स्टँड' केलं आहे. तसेच, यात काहीच गैर किंवा लज्जास्पद नसल्याचंही रणवीर म्हणालेला, त्याच्या मते, शारीरिक संबंध ही एक सुंदर आणि नैसर्गिक भावना आहे, ज्याला जबरदस्तीने टॅग केलं जाऊ नये.

रणवीरनं असंही सांगितलं की, एकदा एका दिग्दर्शकानं त्याला चुकीच्या हेतूने अप्रोच केलेलं, पण त्यानं स्पष्टपणे नकार दिला. कास्टिंग काऊचशी त्याचा हा पहिलाच सामना होता, पण त्यानं परिस्थिती हाताळली. रणवीर सिंहचा भूतकाळ फार बोल्ड असला तरीसुद्धा आता मात्र, तो पत्नी दीपिका पादुकोण-सिंहच्या प्रेमात आकंत बुडाला आहे. 

रणवीर-दीपिका मोस्ट फेवरेट कपल 

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही जोडी इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. अनेकदा हे जोडपं जेव्हा-जेव्हा एकत्र स्पॉट होतं, तेव्हा-तेव्हा पत्नी दीपिकाची काळजी घेताना दिसलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल