Forbes 2020 फोर्ब्सनं आशिया खंडातील 100 डिजिटल स्टार्स अर्थात कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील अशा कलाकारांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी चित्रपट, गीतं, मालिका, सीरिजसोबतच सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांतूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विक्रमी फॅन फॉलोविंग असणाऱ्या काही नावांचाही या यादीत समावेश आहे. कोरोना काळात हताश झालेल्या वर्गाशी संपर्कात राहत त्यांतं सातत्यानं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावाचादी यात समावेश केला गेला आहे.


20व्या वर्षापासून ते अगदी 78 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील सर्वच कलाकारांची नावं असणारी ही यादी पाहता, सोशल मीडियाची ताकद नेमकी किती आहे हे स्पष्ट होत आहे.


बॉलिवूडच्या बाबतीत सांगावं तर, अभिनेता (Akshay Kumar) अक्षय कुमार यानं या यादीत स्थान मिळवलं आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करतो म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अक्षयचे तब्बल 131 मिलियन फॉलोअर्स आहेत. एक अभिनेता असण्यासोबतच तो आपली सामाजिक जबाबदारी जाणत कायमच गरजूंच्या मदतीसाठीही पुढाकार घेताना दिसतो. कोविड19 च्या आव्हानात्क काळातही खिलाडी कुमारनं तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर्स इतकी रक्कम दान स्वरुपात दिली होती.


मे महिन्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून "आई फॉर इंडिया" या कॉन्सर्टमध्येही तो सहभागी झाला होता. ज्या माध्यमातून कोविड 19 मदतनिधीसाठी 520 मिलियन रुपये गोळा करण्यात आले होते.


दरम्यान, फोर्ब्सच्या यादीनुसार अक्षय कुमारनं यंदाच्या वर्षी जवळपास 362 कोटी रुपयांची कमाई केली. हीसुद्धा त्याच्या एकाच चित्रपटाची कमाई आहे. यंदाच्याच वर्षी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. जगभरातील कमाईच्या बाबतीत म्हणावं तर, या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे.


   VIDEO | लकी अलीचा 'ओ सनम' गाणं गातानाचा गोव्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


सदर यादीत सर्वात अग्रस्थानी (BTS) हा बँड आहे. दक्षिण कोरियातील हा बँड सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय बँड आहे. अवघ्या 24 तासांत या बँडच्या एका गाण्याला 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळतात. याव्यतिरिक्त चीनची अभिनेत्री आणि गायिका यांग एमआय, तैवानमधील कलाकार जय चाऊ, जपानमधील विनोदी कलाकार नाओमी वतनबे, अभिनेत्री एंजेल लोक्सिन यांचाही या यादीत समावेश आहे.


हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन, क्रिस हेम्सवर्थ, (Action star) डॉनी येन, दक्षिण कोरियातील के-पॉप गर्ल बँड ब्लॅकपिंक आणि अभिनेता ली मिन-हो, चीनचा क्रिश वू आणि दिलबर दिलमरत, भारतातून शाहरुख खान आणि आलिया भट्ट, तर सिंगापूरमधून गायक-गीतकार जेजे लिन यांचाही या यादीत समावेश आहे.