मुंबई : मुंबईत मंगळवारी सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरुन गोरेगाव फिल्मसिटीत चित्रीकरणासाठी निघालेल्या अभिनेता अजय देवगणच्या कारसमोर गोरेगाव येथे अचानक एक व्यक्ती आली.


"दिल्लीत इतके दिवस झाले, शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांचे तू समर्थन का केले नाही? त्यांच्या समर्थनात तू ट्वीट का केले नाही? असं बोलत जवळपास 15 मिनिटे या व्यक्तीने अभिनेता अजय देवगणची गाडी रोखून धरली होती. हा सर्व प्रकार अनेकजण पाहत होते, मात्र कोणीही यावेळी अजय देवगण याच्या मदतीला धावले नाही तसेच त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे? हे देखील अजय देवगणने माहिती करुन घेतले नाही.


अखेर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आणि पोलीसही पोहोचले आणि पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या राजदीप सिंग याला ताब्यात घेवून अभिनेता अजय देवगण याची गाडी गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत सोडली.


सदर प्रकरणात चौकशी करुन अजय देवगणविरोधात निदर्शने करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजदीप सिंह असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या इसमाविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 341, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाहा लगीनघाईत रमली श्रद्धा कपूर; Photo आणि Video व्हायरल


बी- टाऊनमधील या अभिनेत्याबाबग सांगावं तर, येत्या काळात तो 'गंगूबाई काठियावाडी', 'मैदान', 'सूर्यवंशी', 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया', 'मे डे' आणि 'RRR' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.