Bobby Deol: बॉलीवूडचा ‘लॉर्ड’ बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘Animal’ चित्रपटात रणबीर कपूरसमोर खलनायकाची भूमिका साकारत त्याने बॉलीवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. जरी बॉबीचा रोल फक्त 15 मिनिटांचा असला, तरी त्या काही मिनिटांतच त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली. अनेकांनी तर सोशल मीडियावर म्हटलं की, “बॉबी देओलने रणबीरलाच झाकोळून टाकलं!” मात्र या चर्चेवर बॉबीचा दिलेला प्रतिसाद सगळ्यांच्या मनाला भावला आहे. (Animal Movie)

Continues below advertisement


रणबीरला झाकोळल्याच्या चर्चेवर बॉबीचा प्रतिसाद


Filmygyanला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा बॉबीला विचारलं गेलं की लोकांना वाटतं तू रणबीरला ओव्हरशॅडो केलंस, तेव्हा तो हसत म्हणाला, “असं काही नाहीये. रणबीरला तीन तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं होतं, आणि मला फक्त 15 मिनिटं. जर रणबीरने ते तीन तास नीट हाताळले नसते, तर माझ्या 15 मिनिटांना काहीच अर्थ उरला नसता.”


बॉबी पुढे म्हणाला, “माझ्या पात्राचा परिणाम तसाच झाला कारण रणबीरने आपला रोल अप्रतिम केलाय. जर त्याने ते नीट साकारलं नसतं, तर माझ्या एन्ट्रीलाही इम्पॅक्ट राहिला नसता. अॅक्शन फिल्म असो वा ड्रामा, हिरो आणि खलनायक दोघेही ताकदीचे असले पाहिजेत. सुरुवातीपासूनच हिरो जिंकणार हे माहीत असेल, तर थ्रिलच संपतं.”


सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव


बॉबीचा हा साधा, प्रामाणिक आणि जमिनीवरचा प्रतिसाद पाहून चाहत्यांनी त्याचं अक्षरशः कौतुक केलं. Redditवर या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर होताच, युजर्सनी त्याला “most secure actor” म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला. एका युजरने लिहिलं, “कसलाही ईगो नाही, मत्सर नाही, फक्त शुद्ध अभिनेता!” तर दुसरा म्हणाला, “लॉर्ड बॉबी कायमच क्युट!” आणखी एका चाहत्याने लिहिलं, “आजच्या स्पर्धात्मक वातावरणात एवढं समंजस उत्तर देणारा अभिनेता क्वचितच दिसतो.” अशा प्रतिक्रिया नेटकरांनी दिल्या आहेत. 


‘Animal’ आणि पुढची वाटचाल


2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Animal’ या अॅक्शन-ड्रामामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि त्रिप्ती डिंमरी यांच्या भूमिका झळकल्या. बाप-लेकाच्या नात्यावर आणि सूडाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट ₹915 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला.


आता बॉबी देओल पुन्हा नव्या दमाने तयारीत आहे. त्याचा पुढचा चित्रपट ‘बंदर’ हा अनुराग कश्यप दिग्दर्शित थ्रिलर-क्राईम ड्रामा असून यात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. याशिवाय बॉबी YRFच्या मोठ्या प्रोजेक्ट ‘Alpha’ मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ख्रिसमस 2025मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.