Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ‘अॅनिमल’मधील दमदार भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आला होता. त्या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता बॉबी आणखी एका मोठ्या हिंदी प्रोजेक्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘बंदर’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा होताच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.दमदार स्टारकास्ट आणि अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
इंटेन्स लूकची एकच चर्चा
या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप करणार आहेत. स्वतः बॉबी देओलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बंदर’चं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. पोस्टरमध्ये reopening झालेला त्याचा वेगळा आणि इंटेन्स लूक पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेक चाहते त्याच्या या नव्या अवताराबद्दल उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत. ‘बंदर’मध्ये बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा आणि सबा आझाद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. दमदार स्टारकास्ट आणि अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
कधी होणार रिलीज?
मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. ‘बंदर’चा प्रीमियर प्रतिष्ठित Toronto International Film Festival (TIFF)च्या 50व्या आवृत्तीत होणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर हा चित्रपट 22 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘अॅनिमल’नंतर बॉबी देओल पुन्हा बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडणार का, याकडे आता सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे.