Numerology Of Mulank 5 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचं (Mulank) वेगळं असं महत्त्व असतं. अंकशास्त्रात (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक काढला जातो. आणि व्यक्तीच्या मूलांकानुसार त्याचा स्वभाव, आवडी-निवडी कळतात. या ठिकाणी आपण मूलांक 5 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असतो स्वभाव?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह हा बुद्धी, व्यक्तिमत्त्वचा कारक ग्रह मानला जातो. त्यानुसार, या जन्मतारखेचे लोक फार निडर स्वभावाचे असतात. हे लोक आपल्या अंदाजाने जगणारे असतात. तसेच, हे लोक लवकरच सगळ्यांमध्ये मिसळतात.
वैवाहिक जीवन कसं असतं?
या जन्मतारखेचे लोक फार लवकर इतरांमध्ये मिसळतात. बहुतेकदा हे लोक आपल्या फ्लर्टिंग स्वभावाने ओळखले जातात. यांचा स्वभाव फारच रोमॅंटिक असतो. आपल्या याच स्वभावामुळे ते अनेकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडेसुद्धा आकर्षित होऊ शकतात.
दोनदा लग्न होण्याची शक्यता
या जन्मतारखेचे लोक फार स्वतंत्र विचारांचे असतात. त्यामुळेच यांच्या पहिल्या लग्नात अनेकदा समस्या निर्माण होतात. याच कारणामुळे अनेकदा यांचं दुसरं लग्न होण्याची देखील शक्यता असते.
कमिटमेंट देणं टाळतात
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोकांना लवकर कोणत्या बंधनात अडकायला आवडत नाही आणि या गडबडीत जर यांचं लग्न जरी झालं तरी त्यात स्थिरता मिळवणं, नातं टिकवणं यांच्यासाठी कठीण होऊन जातं. या जन्मतारखेच्या लोकांना स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळेच नात्यात यांना स्पेस जास्त गरजेची वाटते.
'या' जन्मतारखेच्या लोकांबरोबर चांगलं जमतं
मूलांक 1,3 आणि 6 चे लोक यांच्यासाठी चांगले लाईफ पार्टनर ठरु शकतात. यामध्ये मूलांक 2 आणि 7 बरोबर यांचे विचार जुळत नाहीत. यामुळेच नात्यात अनेकदा अडचणी येतात.
कसं असतं करिअर?
या जन्मतारखेचे लोक चांगले बिझनेसमॅन असतात. कारण एखाद्या गोष्टीची रिस्क घेणं आणि आपल्या टॅलेंटने लोकांना प्रभावित करण्यात हे लोक फार तरबेज असतात. मार्केटिंग, मिडिया, सेल्स आणि पत्रकारितेत यांचं चांगलं करिअर होतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :