Horror Film Released In 25 Theaters: तुम्ही सिनेमा पाहता का? कोणते पाहता? म्हणजे कोणत्या जॉनरचा? क्राईम थ्रीलर, कॉमेडी, हॉरर की रोमँटिक, कोणते सिनेमे तुम्हाला आवडतात? काहीजण फक्त क्राईम थ्रीलर किंवा रोमँटिक सिनेमे पाहतात. तर काहींना फक्त हॉरर सिनेमे पाहायला आवडतात. हॉरर सिनेमे सस्पेन्स आणि भितीनं भरलेले असतात. 

Continues below advertisement


काही हॉरर चित्रपट (Horror Movie) असे असतात की, ते चुकून एकट्यानं पाहिले, तर मग सगळं संपलंच म्हणून समजा. जर तुम्ही रात्री चुकून हॉरर चित्रपट पाहिला, तर वॉशरूममध्ये जाणं कठीण होतं आणि भीतीमुळे तुम्हाला साधी झोपही येत नाही. आता हॉरर चित्रपटांमध्ये कॉमेडी मसाला जोडला जातो, ज्यामुळे चित्रपटातील हॉरर दृश्यांवर कमी आणि कॉमेडीवर जास्त लक्ष केंद्रीत केलं जातं. पण पूर्वीचे हॉरर चित्रपट फक्त आणि फक्त भीतीनंच भरलेले असायचे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला त्या हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही एकट्यानं पाहूच शकणार नाही. कारण तो गुगलवरचा आजवरचा सर्वात हॉरर सिनेमा आहे.  


जगातील सर्वात भयानक चित्रपट


गेल्या वर्षी, 'स्त्री 2' आणि 'मुंज्या' सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांनी बॉलिवूडचं मनोरंजन केलं होतं, पण आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो 51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला अजूनही जगातील सर्वात भयानक चित्रपट म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही गुगलवर सर्वात भयानक चित्रपट शोधता, तेव्हा या चित्रपटाचं नाव येतं. हा चित्रपट एक प्रकारे शापित देखील मानला जातो. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वात हॉरर चित्रपटाचं नाव 'द एक्सॉर्सिस्ट' (The Exorcist) आहे, ज्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा हॉरर चित्रपट विल्यम पीटर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोकांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं जातं. अशा परिस्थितीत आयर्लंड, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. IMDb नं चित्रपटाला 8.2 रेटिंग दिलं आहे.


हॉरर फिल्म 'द एक्सॉर्सिस्ट'ची कहाणी अत्यंत घाबरवणारी आणि हादरवणारी आहे. फिल्मच्या कहाणीमध्ये एक छोटुशी मुलगी आहे. जिच्यावर दृष्ट आत्म्यानं कब्जा मिळवला आहे. या मुलीची आई एक अभिनेत्री आहे, जी तिच्या मुलीच्या विचित्र वागण्यानं अस्वस्थ होते. अभिनेत्रीची आई तिच्या मुलीला चर्चमधल्या फादरला दाखवते आणि मुलीला झालेली भूतबाधा काढून टाकायला सांगते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं आहे. 


हॉरर फिल्म 'द एक्सॉर्सिस्ट'चं ज्यावेळी शूट सुरू होतं, त्यावेळी अनेक विचित्र घटना घडलेल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सेटवर आग लागली आणि काही क्रू मेंबर्सचा मृत्यू झालेला. त्याच वेळी, जेव्हा तो सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तेव्हा अनेक प्रेक्षकांना सिनेमा पाहताना हृदयविकाराचा झटका आला. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. 104.96 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं 3,858.94 कोटी रुपयांचा मोठा गल्ला जमवला होता.


पाहा ट्रेलर :



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Payal Rohatgi Sangram Singh Speculation Of Divorce: लग्नाच्या 3 वर्षांतच स्टार कपलचा घटस्फोट? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हायरल पोस्टनंतर चर्चांना उधाण, काय म्हणाली?