मलकापूर (ता. शाहूवाडी) : सावे गावात काल (शुक्रवारी,ता,14) रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. कृष्णा शिवाजी झेंडे (वय 47) या व्यक्तीने आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी घरगुती वादातून पत्नी राधिका झेंडे हिच्यावर धारदार विळ्याने (Crime News) हल्ला केला आणि नंतर स्वतःच गळा चिरून आत्महत्या (Crime News) केली. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते. घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीवन संपवलं.(Crime News) 

घटनेचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं. कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

वाढदिवसाचे स्टेटस सोशल मीडियावर झळकले अन् संध्याकाळी

कृष्णा झेंडे यांचा काल (शुक्रवारी 13 जून) रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेंचे फोटो झळकत होते. वाढदिवस साजरा करायच्या अगोदर वादातून पत्नीवर हल्ला केला. नंतर स्वतःला संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरारोड परिसरात प्रेमसंबंधातून वाद, महिलेची निर्घृण हत्या

मिरारोड कनकिया येथील म्हाडा वसाहतीत एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत मिरारोड पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपीला अटक केली. शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय 24, व्यवसाय – शेफ) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.