Ujjwal Nikam Biopic: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) आता खासदार उज्ज्वल निकम म्हणून ओळखले जाणार आहेत. उज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता. तेव्हा त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. अशातच देशातील काही सुप्रसिद्ध सरकारी वकिलांच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या उज्ज्वल निकमांवर आता बायोपिक येणार आहे. या बायोपिकची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आता सिनेमा येणार आहे. या बायोपिकची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. हा सिनेमा मॅडॉक फिल्म्स निर्मित करत आहे आणि दिग्दर्शन 'पाताल लोक', 'स्कूप' सारख्या लोकप्रिय वेब सीरिजचं कर्तेधर्ते दिग्दर्शक अविनाश अरुण करत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, या सिनेमावर काम सुरू झालं असून लवकरच रुपेरी पडद्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची जीवनगाथा उलगडणार आहे. पण, या सिनेमाबाबत बऱ्याच दिवसांपासून एक चर्चा सुरू होती की, या सिनेमात उज्ज्वल निकम यांची भूमिका कोण साकारणार? आता याचंही उत्तर मिळालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकबद्दल बऱ्याच काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. याआधी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सुपरस्टार आमिर खानचं नाव पुढे येत होतं. पण, निर्मात्यांनी उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी 800 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याला साईन केलं आहे. चित्रपटाची शूटिंग आणि रिलीज डेटबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे.
उज्ज्वल निकम यांचा बायोपिक 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि 2008 च्या मुंबई ट्रेन हल्ल्यातील वादग्रस्त न्यायालयीन कारवाईवर आधारित असेल. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात येणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन अविनाश अरुण करणार आहेत.
800 कोटींची फिल्म देणारा अभिनेका साकारणार मुख्य भूमिका
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावला कास्ट करण्यात आलं आहे. 2024 मध्ये आलेल्या राजकुमार रावची फिल्म 'स्त्री 2'नं वर्ल्डवाईड 874.58 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर राजकुमारकडे फिल्म्सची लाईन लागली आहे. 'विक्की विद्या का वो वाला वीडियो', 'भूल चूक माफ', 'मालिक' आणि सौरव गांगुलीच्या बायोपिकनंतर आता अभिनेत्याच्या झोळीत उज्ज्वल निकम यांची बायोपिकही राजकुमार रावच्या पारड्यात पडली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, "उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकची तयारी सध्या सुरू आहे आणि राजकुमार रावला खऱ्या आयुष्यातील वकिलाची भूमिका साकारण्यासाठी अभिनय कार्यशाळेत मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटासाठी अनेक नावांचा विचार करण्यात आला होता, पण शेवटी दिग्दर्शकांना वाटलं की, चित्रपटासाठी राजकुमार रावइतकं योग्य नाव दुसरं असूच शकत नाही. अविनाश अरुण, दिनेश विजन आणि राजकुमार राव हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यास उत्सुक आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही सर्वात मोठ्या न्यायालयीन लढायांचं पुनरुत्पादन करेल."
उज्ज्वल निकम यांचा बायोपिक कधी प्रदर्शित होणार?
उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचं चित्रीकरण या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचं नियोजन आहे. निर्मात्यांना मार्च 2026 पर्यंत चित्रीकरण पूर्ण करायचं आहे. जर सर्व काही वेळेवर झालं तर राजकुमार राव स्टारर हा चित्रपट 2026 च्या उत्तरार्धात प्रदर्शित होऊ शकतो.
दरम्यान, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केलीय. गृहमंत्रालयाने ही माहिती जाहीर केली. 2024 मध्ये उज्वल निकम यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढली होती. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र आता लोकसभा पराभवानंतर निकम यांच्यासाठी राज्यसभेचं दार खुलं करण्यात आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :