Tanvi Kolte Marriage: बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन संपला तरी त्यातील स्पर्धकांची चर्चा अजूनही सुरू आहे. तन्वी कोलते या सीझनची विनर ठरली. टॉप 3मध्ये तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन होते. तन्वीने दोघांनाही मागे टाकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तन्वी सध्या प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत आहे. तन्वी लग्न कधी करणार? हा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. बिग बॉसच्या घरातील भांडणामध्ये तन्वी अनेकदा आपल्या लग्नाचा उल्लेख करायची. 'मला बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर लग्न करायचं आहे, काहीही बोलू नका', असं तन्वी म्हणायची. तन्वीचं स्वत:च्या लग्नाबाबतीत प्लॅनिंग आहे तरी काय? यावर तिनं प्रतिक्रिया दिली आहे.
'मला आधी माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे' (Tanvi Kolte marriage plans after Bigg Boss Marathi 6)
अलिकडेच तन्वी कोलतेनं राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं लग्नावर भाष्य केलं आहे. 'मला आधी माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे. मी बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून सांगत आले होते की, मला गेममध्ये अफेअर वगैरे करायचं नाही. कारण 3 महिन्यांत कुणालाही प्रेम होऊ शकत नाही. मी लव्ह अँगल देणार नाही, असं मी म्हणाले होते. मी एकटीच जाणार, एकटीच बाहेर पडणार, छान खेळणार', असं तन्वी म्हणाली.
तन्वी कोलते लग्नाबाबत नेमकं काय म्हणाली? (Bigg Boss Marathi winner Tanvi Kolte on Marriage)
'मला काही जण फटकळ म्हणतात. मी खरंतर जुन्या विचारांची आहे. माझी आई जे सांगेल त्याच मुलाशी मी लग्न करेन', असं तन्वीने मुलाखतीत स्पष्ट केलं. बिग बॉसची विनर तन्वी कोलते सध्या सेलिब्रेशन करत आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा आनंद घेत आहे. तन्वीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, तन्वी आता कोणत्या मालिका किंवा सिनेमात दिसणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. सध्या बिग बॉसमुळे तन्वीचं विशेष कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'आता हा अध्याय संपला'; घटस्फोट का घेतला? डिव्होर्सवर राहुल देशपांडे पहिल्यांदाच बोलला
