Bigg Boss OTT Season 3 : बहुप्रतिक्षित बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनला (Bigg Boss OTT Season 3) सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) होस्टच्या खुर्चीत बसलेत. या सिझनमध्ये अनेक सोशल मीडियावरचे कलाकार हे स्पर्धक म्हणून सहभागी झालेत. यामध्ये युट्युबर अरमान मलिक देखील सहभागी झाला आहे. ग्रँड प्रमिअर सोहळ्याला अरमानच्या दोन्ही बायका देखील उपस्थित होत्या. यावेळी अरमाने त्याच्या दोन लग्नांची गोष्ट देखील सांगितली. ते सगळं ऐकून अनिल कपूरच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. 


कृतिका हा अरमानची पहिली बायको पायल हिची मैत्रीण आहे. अरमानच्या मुलाच्या वाढदिवस कृतिका ही त्यांच्या घरी आली होती. तेव्हा कृतिका आणि अरमानचे सूत जुळले आणि त्यांनी लग्न केलं. सुरुवातीला पायलने त्यांना परवानगी दिली नाही. पण नंतर तिनेही हे लग्न मान्य केलं. हे सगळं या तिघांनी बिग बॉसच्या मंचावर सांगितलं. तसेच अनिल कपूरने काही मजेशीर प्रश्न अरमानला विचारले, या सगळ्याची उत्तर अरमानला किस करुन द्यायची होती. 


बिग बॉसच्या मंचावर अरमानला प्रश्न


बिग बॉसच्या मंचावर अरमानला पहिला प्रश्न विचारण्यात आला की, दोघींपैकी कुणासोबत सुट्टीवर जायला तू पटकन तयार होशील तेव्हा अरमानने पायलला किस केलं. दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, जेवण कोण चांगलं बनवतं, तेव्हा तो कृतिकाला किस करतो. दोघींपैकी जेलस कोण जास्त होतं, तेव्हा अरमान पायलला किस करतो. दोघींपैकी कोणाचं जास्त ऐकतोस,तेव्हा तो कृतिकाला किस करतो. दोघींपैकी खोटं कोण चांगलं बोलतं, तेव्हा तो पायलला किस करतो. दोघींपैकी रोमँटीक कोण जास्त आहे, त्यावर तो पुन्हा पायलला किस करतो. दोघींपैकी जास्त खर्च कोण करतं, त्यावेळी तो परत एकदा पायललाच किस करतो. दोघींपैकी कुणाला जिंकलेलं तुला पाहायला आवडेल, तेव्हा तो कृतिकाला किस करतो. शेवटी अनिल कपूर विचारतो की बिग बॉसच्या घरात एक शेवटचा सिंगल बेड आहे, तो कुणासोबत शेअर करायला आवडेल, त्यावर तो मला पायल सोबत शेअर करायला आवडेल असं उत्तर देतो. 


'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'हे' स्पर्धक असतील


मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस ओटीटी 3'साठी शिवांगी जोशी, अहाना देओल, भव्या गांधी, शीझान खान, हर्षद चोप्रा, शहजादा धामी, प्रतीक्षा होंमुखे, वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक, कृती सेननची बहिण नुपूर सेनन, संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त, तनुश्री दत्ता आमि हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओलला विचारणा झाली असल्याची माहिती समोर आली होती.