Bigg Boss OTT Fame Chandrika Dixit Sparks Buzz with mystery man: बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्म फेम वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित कौटुंबिक कारणामुळे चर्चेत आहे.  सध्या तिचे पती युगम गेरासोबत काही कारणावरून मतभेद सुरू आहे. दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, चंद्रिकाचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे. त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे.  चंद्रिकासोबतचा व्यक्ती नेमका आहे तरी कोण? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.

चंद्रिका दीक्षितने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप अस्वस्थ दिसत आहे. ती संतापून त्या व्यक्तीला, 'तुम्हाला माहिती आहे का? की मीडिया तुम्हाला काय म्हणते आहे? ते आमच्याबद्दल काय बातम्या प्रकाशित करत आहेत? मिस्ट्री मॅन...' अशी म्हणते. तो व्यक्ती म्हणतो, 'मिस्ट्री मॅन.. ड्रामा. सर्वांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ'. तेव्हा वडा पाव गर्लने 'कधी उत्तर देणार?' असा प्रश्न विचारते. त्या माणसाने  सांगितले की तो,  8 तारखेला सर्व काही उघड करेल. सध्या वडा गर्लची ही पोस्ट शेअर केली आहे.

वडा पाव गर्लचा हा व्हिडिओ  वापरकर्त्यांमध्ये व्हायरल होत आहे. चंद्रिकासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं 8 फेब्रुवारी रोजी उत्तर मिळेल.   8 फेब्रुवारी रोजी काय मोठा खुलासा होणार? हे पाहणं महत्त्वाचं  ठरेल.   काहींनी दोघेही ड्रामा क्विन असल्याचं म्हटलं आहे. तर,  काहींना वाटते की, चंद्रिका कदाचित  एखाद्या प्रोजेक्टचा खुलासा करणार आहे.  तर, काही वापरकर्ते तिच्या पतीसोबतच्या भांडणाला ड्रामा देखील म्हणत आहेत. 

 चंद्रिकाने हा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण?  नावाचा इन्स्टा अकाऊंट सुरू केला आहे. तिनं या व्यक्तीसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.  या अकाऊंटला फक्त चंद्रिका फॉलो करत आहे.  तिनं या पुरूषासोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.  एका फोटोमध्ये ती मिस्ट्री मॅनच्या मिठीत दिसत आहे.  तर, एका पोस्टमध्ये चंद्रिकाच्या भांगेत कुंकू दिसत आहे.  ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे दुसरे लग्न झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, वडा पाव गर्लचे दुसरे लग्न झाले आहे का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.