Abhijeet Sawant On Musicians Royalty: काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) निवृत्ती घेतली आणि सर्वांना धक्का दिला. अरिजितनं घेतलेल्या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाच, पण अख्खं बॉलिवूड (Bollywood News) हादरलं. काहींनी अरिजितला समजावण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याच्या निर्णयाला पाठींबा दिला. एकीकडे बॉलिवूडमध्ये अरिजितच्या निवृत्तीची चर्चा रंगली असतानाच, आता मराठी गायक, इंडियन आयडॉल पहिला विजेता अभिजीत सावंतनं एक मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) यानं गायकांना फुकट काम करण्यासाठी लाचार केलं जातं, असं सांगितलं.

Continues below advertisement

'पेंटाराइज स्टुडिओज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिजीत सावंतनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच, गायक एखाद्या सिनेमातूनही लोकप्रिय व्हावा असं काही लोकांना वाटत नाही, असंही अभिजीत सावंतनं सांगितलं. सिनेमा हिट होतो, गाणी लोकप्रिय होतात. पण आम्हाला रॉयल्टी मिळत नाही, असंही अभिजीत सावंत म्हणाला. 

अभिजीत सावंत नेमकं काय म्हणाला? 

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता अभिजीत सावंत म्हणाला की,  "गायक एखाद्या सिनेमातूनही लोकप्रिय व्हावा असं काही लोकांना वाटत नाही. गायकांना ठराविक रक्कमच दिली जाते. जेणेकरुन तो गायक सिनेमापेक्षा मोठा होऊ नये. संगीत हा सिनेमाचा फक्त भाग आहे, असंच त्याकडे बघितलं जातं. सिनेमा हिट होतो, गाणी लोकप्रिय होतात. पण आम्हाला रॉयल्टी मिळत नाही. संगीतकारांना आजही सिनेमातील संगीतासाठी रॉयल्टी मिळत नाही..."

Continues below advertisement

"उदाहरण द्यायचं तर संगीतकार बिड्डू ज्यांनी माझ्या 'लफ्जो मे' या म्युझिक व्हिडीओसाठी संगीत दिलं होतं त्यांनी परदेशात दोन गाणी केली. त्या गाण्यातून त्यांनी इतकी रॉयल्टी मिळाली की त्या पैशांमधून ते पूर्ण आयुष्य काढू शकतात. त्या गाण्यातून एकेकाळी तर तो चांगला पैसा कमावत होता. तेच आम्हाला इथे एका गाण्यातून इतके पैसे मिळतील याचा आम्ही विचारही करु शकत नाही. कारण ही सिस्टीमच अशी आहे. दुसरं म्हणजे गायकही लोभी आहेत. पैसे भलेही कमी मिळतील पण हे गाणं माझ्या आवाजात असावं असा विचार करुन ते ऑफर स्वीकारतात. हे काही छोट्या गायकांचं नाही तर सगळेच अगदी मोठमोठे गायकही हेच करतात. या संगीतकाराकडे, या कलाकारासाठी, या सिनेमासाठी मी गाणं करेन तर आपलं करिअर बनेल असं त्यांना वाटतं. त्यामुळे आम्ही स्वत: गायकांचीही यात चूक आहे.", असं अभिजीत सावंत म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mrunal Thakur Spotted With Baby Bump: अजून लग्नाचा पत्ता नाही अन् बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गरोदर कशी? लग्न झालेल्या अभिनेत्यासोबत बेबी बंप केला फ्लॉन्ट PHOTOs