Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी'चा सीझन 2 सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. आजकाल 'बिग बॉस OTT 2' मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. त्यामुळे या शोचा TRP चांगलाच वाढलेला आहे. आता या शोचा फिनाले जवळ आलेला आहे. या शोमध्ये रोज वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. मात्र आता हा शो नेमका जिंकणार कोण हे आता पाहणं महत्वाच ठरणार आहे. Bigg Boss फिनाले , वेळ आणि कोणता फायनलिस्ट किती रक्कम जिंकणार हे सगळे सविस्तर जाणून घेऊयात.


बिग बॉस OTT 2 चा अंतिम फेरी कोणत्या तारखेला होईल?


Bigg Boss OTT चा फिनाले हात जुलैमध्ये होणार असे सांगण्यातआले होते. मात्र शोचा TRP मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शोचा होस्ट सलमान खान याने हा शो दोन आठवडे वाढवण्यात येणार याची घोषणा केली. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला असून 12 किंवा 13 ऑगस्टला ग्रँड फिनाले होऊ शकतो. मात्र नेमकी तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. 


बिग बॉसमधील फायनलिस्ट


ओटीटी 2 च्या अंतिम फेरीत अभिषेकने टास्कमध्ये पूजा भट्टला हरवून फायनलिस्ट बनला आहे. तर सध्या सोशल मिडीयावर एलविश, मनीषा राणी आणि जीया यांच्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे फायनलिस्ट आता यापैकी कोण होईल हे पाहणं प्रेक्षकांकरता महत्वाचे ठरणार आहे. 


बिग बॉस OTT 2 विजेता-उपविजेता कोण असू शकतो?


सोशल मिडीयावरील एकंदरीत सर्व चर्चा पाहता एलविश आणि अभिषेक ट्राॅफी जिंकतील. वेड चित्रपटातील भन्नाट अभिनयामुळे जीयाला प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केलेले आहे. त्यामुळे जीया किंवा मनीषा राणी उपविजेता होऊ शकतात. 


बिग बॉस OTT 2 च्या बक्षिसाची रक्कम किती असेल?


अलीकडेच Bigg Boss OTT 2 च्या एका एपिसोडमध्ये मनीषा राणी आणि अभिषेक Bigg Boss जिंकल्यावर मिळणाऱ्या रक्कमेबद्ल चर्चा करताना दिसले होते. त्यावरून जिंकणाऱ्या स्पर्धकाला तब्बल 25 लाख मिळू शकताात. तर मागच्या वर्षी Bigg Boss OTT Season 1 मध्ये जिंकलेली दिव्या अगरवालने देखील 25 लाख रक्कम जिंकली होती. सध्या अभिषेक फायनलिस्ट झाला असून एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट, जेडी हदीद, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि बाबिका धुर्वे या शोमध्ये टिकून राहिले आहेत. त्यामुळे आता हा शो जिंकणार कोण हे पाहण्याकरता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Viral Video : "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज