Suraj Chavan divine power statement: झापुक झुपूक करत अभिनेता आणि इन्फ्लुएंसर सुरज चव्हाणने (Suraj Chavan) अख्खा मार्केट जाम केला. सुरज चव्हाण सोशल मीडियात (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. सुरज चव्हाणला खरी ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 मधून विशेष मिळाली. त्यानं आपल्या सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावातून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच बिग बॉस मराठीची ट्रॉफीही जिंकली. अलिकडेच सुरज लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. अलिकडेच सुरजने मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरजने आपल्या कारकि‍र्दीची माहिती दिली. तसेच आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं म्हटलं आहे.

Continues below advertisement

बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाणच्या यशामागे मरी आई मातेचा आशीर्वाद असल्याचं तो वारंवार म्हणत असतो. एका मुलाखतीत सुरज म्हणाला, 'आई मरी माता, भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांच्यापासून माझ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते.  मला या देवतांकडून खूप मोठी शक्ती मिळते.  माझ्याकडे एक दैवी शक्ती आहे. मरी आई माता मला बुद्धी देते. मी काहीही बोलेन ते अख्ख्या महाराष्ट्रात गाजेल.  लोक खूप प्रेम देतात', असं सुरज चव्हाण मुलाखतीत म्हणाला. 

आयुष्याच्या प्रवासाबद्दल सुरज म्हणाला, 'लहानपणी माझे आई- वडील प्रचंड लाड करायचे. मला 5 बहिणी आहेत. मी घरात सहावा आहे. माझे वडील कायम माझी इच्छा पूर्ण करायचे. वडील गेल्यानंतर माझी इच्छा पूर्ण करणारं कुणीच नव्हतं. 'फाटके कपडे, घराची परिस्थिती बिकट, लोक खूप नावं ठेवायचेत', असं सुरज चव्हाण म्हणाला.  'भाच्याकडून मी व्हिडिओ करायलो शिकलो.  नंतर माझ्या कष्टाने मी माझा पहिला मोबाईल घेतला.  बुक्कीत टेंगुळ हा डायलॉग प्रचंड गाजला', असं सुरज म्हणाला. 

Continues below advertisement

'एसक्यू आरक्यू झेडक्यू हा डायलॉग आधी गाजला. व्हिडिओत माझ्या मित्राने, एसक्यू आरक्यू झेडक्यू या डायलॉगनंतर सुरज भाऊ तुमचा कोणता नवीन डायलॉग  आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा देऊ का एक बुक्कीत टेंकुळ?  असं म्हणालो. माझे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. बुक्कीत टेंगुळ हा डायलॉग ट्रेंडिंगवर आलं. यावर अनेक गाणी तयार झाली. मला देवीनं कला दिली आहे. माझा पॅटर्न वेगळा आहे', असं सुरज म्हणाला. 'मी आतापर्यंत कुणाचेच पाय खेचले नाही.  लोक पुढे जाऊदेत. पण मला कॉपी करुन मला बोललेलं मला आवडत नाही. माझ्यासाठी फॅन्स म्हणजे देव आहेत', असंही सुरज म्हणाला.