Bigg Boss Marathi Season 6 Voting Trends: जानेवारी महिन्यात 17 स्पर्धकांसह सुरू झालेला बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi) 6 स्पर्धकांसह अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. बहुप्रतिक्षित महाअंतिम सोहळा (Finale Contestants) अवघ्या काही दिवसांवर ठेपला आहे.  रितेश देशमुखने (Ritiesh Deshmukh) सूत्रसंचालन केलेला हा शो कायम चर्चेत राहिला.  गेल्या 3 महिन्यांत बिग बॉसच्या घरात बऱ्याच गोष्टी घडल्या.  विविध प्रकारचे टास्क असो किंवा इमोशनल क्षण, स्पर्धकांची धम्माल, मस्ती देखील प्रेक्षकांना पाहता आली.  मागच्या आठवड्यात म्हणजेच शनिवारी 11 एप्रिलला ड्रामा क्विन राखी सावंतला (Rakhi Sawant) घरातून निरोप  घ्यावा लागला.  राखी सावंतचं एलिमिनेशन अनेकांसाठी धक्कादायक होतं.  आता बिग बॉसच्या घरात एकूण 6 स्पर्धक उरले आहेत. 6 स्पर्धकांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.   

Continues below advertisement

बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु (Bigg Boss Marathi Season 6 reaches its finale week)

6 स्पर्धकांमध्ये सध्या बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राखी सावंत एलिमिनेट झाल्यापासून, बिग बॉसच्या घरात राकेश बापट,  तन्वी कोलते,  अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद  आणि रेवा कौरासे हे स्पर्धक उरले आहेत.  तन्वी कोलतेनं राकेश बापटला हरवून तिकीट टू फिनालेचा मान पटकावला.  फिनाले वीक सुरु झाल्याने निर्मात्यांनी आणखी एक ट्विस्ट आणला होता. राखी सावंत एलिमिनेट झाल्यानंतर, ग्रँड फिनालेपूर्वी  मिड - वीक एलिमिनेशन्ससाठी व्होटिंग लाइन्स पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.

व्होटिंग ट्रेंडनुसार कोणता स्पर्धक सेफझोनमध्ये आहे?

व्होटिंग लाइन्स 13 एप्रिल  (सोमवार) दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरु होते.  फिनालेचा आठवडा सुरू होण्यापूर्वी आणखी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागेल.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसजसं फिनाले जवळजवळ येत आहे, तसतसं जनतेचा कौल तन्वी कोलतेच्या बाजूने असल्याचं व्होटिंग ट्रेंडनुसार स्पष्ट होत आहे.  विशेष म्हणजे, तन्वी कोलतेला विशेष प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळत आहे. तसेच नेटकऱ्यांकडूनही तन्वी कोलतेच्या खेळाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. यामुळे तन्वी कोलते सध्या आघाडीची स्पर्धक आहे.   दुसऱ्या क्रमांकावर राकेश बापट असून, त्यानंतंर अनुश्री मानेला प्रेक्षकांकडून सर्वाधिक व्होट मिळाले आहे.

Continues below advertisement

बॉटम 3 मध्ये किती स्पर्धक? (Bigg Boss Marathi Bottom 3 Contestants)

दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे बॉटम 3 स्पर्धक आहेत.  या तिघांमधून एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लता दीदी म्हणाल्या..आशा, तुला काय पाहिजे ते माग; आशा भोसलेंची भावनिक मागणी, मला जुन्या साडीवर...