Ashok Kharat Anjali Damania: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे (Datta Karale) यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.

Continues below advertisement

Anjali Damania: नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये IG दत्ता कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खरातांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे.  त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.  

Anjali Damania:  अशोक खरात आणि नाशिक पोलिस IG यांच्यात नेमके काय संबंध 

यापूर्वी, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये त्या खरातचे पाय धुताना दिसल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली. परिणामी, वाढत्या दबावामुळे चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. आता यानंतर IG दत्ता कराळे यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून अशोक खरात आणि नाशिक पोलिस IG यांच्यात नेमके काय संबंध आहेत, याची आता जोरदार चर्चा होत आहे.

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ED ची मोठी कारवाई

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत नाशिक, शिर्डी आणि पुण्यात एकूण 11 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागले असून, पुण्यातील प्रकाश पोफळे यांच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

तसेच ईडीने अशोक खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे 2.5 कोटी रुपये गोठवले असून, एक मर्सिडीज बेंझ कारही जप्त केली आहे. कागदपत्रांच्या आधारे सुमारे 10 कोटींच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. दरम्यान, सिन्नरमधील शिवनिका संस्थेच्या कार्यालयात तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली. मिरगाव येथील कार्यालय आणि जगदंबा पतसंस्थेतही तपास करण्यात आला असून, बँक स्टेटमेंटसह महत्त्वाचे कागदपत्र ईडीने जप्त केले. मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरण: संस्थानच्या विश्वस्ताला अटक

त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका भाविकाकडून दर्शनासाठी 3 हजार रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात थेट संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात खळबळ उडाली असून, मंदिर व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

आणखी वाचा 

Pratibha Chakankar On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!