Bigg Boss Marathi Season 6: “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार ओळींसह रितेश भाऊंनी बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 6) नवा प्रोमो समोर आणला आणि क्षणातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. सहाव्या सीझनची चर्चा आधीच रंगात असताना, हा बहुप्रतिक्षित प्रोमो म्हणजे यंदाच्या खेळाचा ‘मूड सेटर’ ठरतोय. प्रोमो पाहताच एक गोष्ट स्पष्ट होते. यंदाचा खेळ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून, घरातल्या प्रत्येक सदस्याचं नशीब बदलवणारा असणार आहे.

Continues below advertisement

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” या कडक संवादात रितेश भाऊंनी सीझन 6 चा सूर ठरवून टाकलाय. दारापलीकडे नेमकं काय असणार? कोणत्या क्षणी कोणाचा डाव उलटणार? कोण पास होणार आणि कोण फेल? असे अनेक प्रश्न प्रोमोने उभे केले असून, त्याची उत्तरं ‘दार उघडल्यानंतरच’ मिळणार असल्याचं भाऊंनी सूचकपणे सांगितलं आहे. त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दारापल्याड लपलेलं ‘सरप्राईज’ लवकरच येणार समोर 

प्रोमो रिलीज होताच सर्वात जास्त चर्चेत आहेत ते रितेश भाऊंच्या कोड्यातून गेम आणि घराची थीम उलगडणारे संवाद. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही भाऊ काहीतरी हटके घेऊन आलेतअशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत. नवा लूक, वेगळा स्वॅग आणि तितकाच धारदार अंदाज. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” ही ओळ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. या संवादांमधूनच यंदाचा खेळ किती अनपेक्षित व twistने भरलेला असणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Continues below advertisement

यंदाचं बिग बॉसचं घरही तितकंच भव्य आणि रहस्यमय असणार आहे. शेकडो दार-खिडक्यांनी सजलेलं हे घर केवळ देखणं नाही, तर प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकणारं आहे. दारापल्याड लपलेलं ‘सरप्राईज’ ठरवणार कोण पुढे जाणार आणि कोण मागे पडणार. त्यामुळे घर कसं दिसणार, आत कोणते ट्विस्ट आहेत आणि क्षणात खेळ कसा बदलणार हे सगळे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. बिग बॉस मराठी सिझन 6, 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दार उघडणार… आणि नशिबाचा खेळ खरंच पालटणार, हे पाहण्यासाठी आता सगळेच आतुर झालेत!