Weekly Horoscope 29 December 2025 To 4 January 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचे शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच, अवघ्या काही दिवसांतच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा शेवटचा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. तसेच, नवीन वर्षाची सुरुवात तुमची सकारात्मक विचारांनी होणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी निर्माण झालेल्या दिसतील. तसेच, तुमच्या कामाच्या बाबतीत काही नवीन गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल. तंत्रज्ञानाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल. या नवीन वर्षासाठी साधलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील डिसेंबरचा नवीन आठवडा कुतूहलाचा असणार आहे. या काळात अशा अनेक गोष्टी घडतील ज्याने तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल. मग मुलांच्या बाबतीत शुभवार्ता असो किंवा तुमच्या भविष्यात येणाऱ्या संधी असो. जवळच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागा. तसेच, आपल्या स्वभावात थोड्याफार फरकाने बदल करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा खूप संधी निर्माण करणारा असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. ज्या कामाची तुमची आतुरतेने वाट पाहात होतात ते काम नवीन वर्षात समोरुन तुमच्याकडे येईल. त्यामुळे पेशन्स तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तसेच, या कालावधीत स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. तसेच, प्रेम जीवनात देखील चांगला बदल दिसून येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सिंगल असाल तर पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत अजिबात तडजोड करु नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, काही गोष्टींतून तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. या आठवड्यात काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना तुम्हाला दिसतील. या कालावधीत तुम्हाला आपली माणसं कोण हे ओळखायला तुम्ही शिकाल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तडजोड करण्याची गरज नाही. नातेसंबंधांवर विश्वास ठेवा. तसेच, आपल्या करिअरच्या बाबतीत प्रामाणिक राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :