Bigg Boss Marathi Rakesh Bapat Trolled: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे टोळी विरुद्ध काँटा गँगमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. तर, दुसरीकडे राखी सावंतच्या (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. खेळ जसजसा पुढे जातोय, तसंतसे घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडताना दिसतेय. सीझनच्या सुरुवातीपासूनच स्ट्राँग दिसलेल्या टोळीमध्ये मतभेद निर्माण झालेत. तर, दुसरीकडे काँटा गँगमध्ये असलेले राकेश बापट (Rakesh Bapat) आणि तन्वी कोलते (Tanvi Kolte) यांच्यातली मैत्री आणखी घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. घरात नुकताच एक टास्क पार पडला, त्या टास्कमध्य तन्वी कोलते आणि राकेश बापट यांनी रोमँटिक डान्स केला. पण, डान्स करताना राकेशनं केलेल्या एका कृतीनं सर्वांनाच धक्का बसला. 

Continues below advertisement

तन्वी आणि राकेशनं रोमँटिक डान्स केल्यामुळे राखीची आगपाखड झाली. तिचा पारा चढला. राखीला डिवचण्यासाठी राकेशनं पुन्हा तन्वीला तिच्यासमोरच गालावर किस केलं. ते पाहून राखी आणखी भडकली. मग शांत बसेल ती राखी सावंत कसली. राखीनं घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. तिनं थेट स्वत:चे केस कापले. राखीनं उचललेल्या पावलामुळे घरातले पुरते हैराण झाले. राखीनं हैदोस घातला असला तरीसुद्धा या संपूर्ण प्रकरणामुळे राकेश बापट मात्र, चांगलाच ट्रोल होत आहे. राकेश बापटनं तन्वीसोबत केलेला रोमँटिक डान्स आणि तिच्या गालावर केलेलं किस, सर्वांच्या नजरेत भरलं आणि चाहत्यांचा तीळपापड झाला. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या बिग बॉसच्या घरातील या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

नेमकं काय घडलं? 

'बिग बॉस मराठी'चा घरात राकेश बापट आणि तन्वी कोलते डान्स करतात. या रोमँटिक डान्स दरम्यान राकेश तन्वीला गालावर किस करतो. त्यानंतर राखी तन्वीला विचारते, हा कोणता डान्स आहे? त्यावर तन्वी राकेशला विचार असं सांगते... तन्वी आणि राकेशचा डान्स सुरू असताना राखी डोळे बंद करते. एवढंच नाही तर डान्स संपल्यानंतर राकेश पुन्हा एकदा तन्वीला किस करतो आणि राकेश हसतो, त्यानंतर मात्र राखीला राग येतो आणि ती तू परिणाम बघ असं म्हणते. त्यानंतर घरात एक वेगळीच धक्कादायक गोष्ट घडते.

राखी सावंत हातात कात्री घेते आणि रागारागात स्वत:चे केस कापते. घरातील सदस्य यावेळी तिथे येतात. राखी तू हे काय करतेयस, असं प्रश्न राकेश राखीला विचारतो. त्यावर राखी म्हणते, "राकेश, मी स्वत:ला शिक्षा देतेय. मला कोणी हर्ट करू शकत नाही, फक्त मी स्वत:ला हर्ट करू शकेत...", असं म्हणत राखी ढसाढसा रडू लागते.

युजर्सच्या भन्नाट कमेंट्स

राकेशनं तन्वीला किस केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. "बिग बॉसच्या घरातला इमरान हाश्मी राकेश", अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरनं "शोची काय लेव्हल सुरू आहे...", असं म्हटलंय. "बहीण भाऊ म्हणतात आणि असं वागतात... बिग बॉससाठी काय काय करतील...?", "आता तन्वीच्या घरचे बघत नसतील ना...?", "हा शो बंद झालेला बरा...", "तन्वीला असेच अँगल बनवायचे असतात...", अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tanvi Kolte Instagram Account Deactivate: 'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक तन्वी कोलतेला बसलाय मोठा फटका; इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब, चाहत्यांना काहीच कळेना