मुंबई : सध्या बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात अनपेक्षित ट्विस्ट येत आहेत. जो सदस्य घराबाहेर जाईल अशी शक्यता असते, तो नॉमिनेशनमध्ये एकदम सेफ राहतोय. तर सगळ्या टास्कमध्ये जोरदार कामगिरी करणारा एखाद्या सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम नरवडे याला एलिमिनेट झाला आहे. दरम्यान, आपला मित्र अरबाज पटेल हा एकदम सेफ असल्याचे समजताच नक्की तांबोळीने खास रिअॅक्शन दिली आहे. 


निक्की तांबोळीने हात जोडले 


बिग बॉसने आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतोय. सोबतच त्याने एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव जाहीर केले आहे. या सदस्याचे नाव जाहीर होताच, इतर स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील हाभवाव पाहण्यासारखे आहेत. जान्हवी किल्लेकर तर चांगलीच चकित झालेली पाहायला मिळत आहे. तर निक्की तांबोळी रितेश देशमुखचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकताना दिसतेय. ती गंभीर झाली आहे. एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये घन:श्याम आणि अरबाज पटेल दोघेच राहिले होते. यावेळी अरबाज सेफ असल्याचे समजताच निक्कीने गुडघ्यावर बसून हात जोडले. देवाचे आभार मानले. तिची हीच रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे. 


कोण कोण झाले होते नॉमिनेट? 


या आठवड्यात बिग बॉसच्या घरात मोठे मनोरंजक प्रसंग घडले. टाक्सदरम्यान तर हेच स्पर्धक अनेकवेळा एकमेकांना भिडताना दिसले. या आठवड्यात घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल असे एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. या सात सदस्यांपैकी घन:श्याम नरवडे हा एलिमिनेट झाला आहे. त्यामुळे आज रविवारी त्याचा बिग बॉसच्या घरातील शेवटचा दिवस असेल. बिग बॉसच्या प्रोमेत तसे दाखवले आहे. 


निक्कीचा मित्र अरबाज पटेल सेफ


बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात खास केमिस्ट्री दिसून आली आहे. वेगवेगळ्या टास्कमध्ये हे दोघेही एकमेकांना पाठिंबा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नॉमिनेशनच्या प्रक्रियेत या दोघांनीही एकमेकांना सहकार्यच केलेलं आहे. या आठवड्यात मात्र अरबाज पटेल एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाला होता. म्हणजेच जनतेने पाठिंबा न दिल्यास त्याला थेट बिग बॉस मराठीच्या घराच्या बाहेर जावे लागले असते. मात्र अरबाज या आठवड्यात सेफ राहिला. त्याऐवजी घन:श्याम नरवडे हा एलिमिनेट झाला आहे. आपला मित्र अरबाज पटेल सुरक्षित असल्याचे लक्षात येताच निक्की तांबोळीने खास रिअॅक्शन दिली आहे. तिची हीच रिअॅक्शन बिग बॉस मराठीने शेअर केलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, आजचा भाऊचा धक्का विशेष असणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या भाऊच्या धक्क्यावर दम्माल मस्ती होणार आहे.  


हेही वाचा :


बिग बॉस मराठीच्या घरात घन:श्याम दरवडेला नारळ, छोटा पुढारी झाला एलिमिनेट!