Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन (Bigg Boss Marathi Season 6) तुफान गाजला. या सीझनमध्ये राडे, अरेरावी, भांडणं, आरोप-प्रत्यारोप सगळं सगळं पाहायला मिळालं. या सीझनची विनर अभिनेत्री तन्वी कोलते (Actress Tanvi Kolte) ठरली. 17 स्पर्धकांपासून सुरू झालेल्या खेळात तन्वीनं घरातला प्रत्येक दिवस आपल्यात बदल घडवत पार केला. आपला स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिक खेळीच्या जोरावर तन्वीनं विजेतेपदापर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. अशातच तन्वीनं बिग बॉस (Bigg Boss Marathi) जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्वी कोलतेनं झी मराठीवरील (Zee Marathi) 'लक्ष्मी निवास' मालिका (Lakshmi Niwas Serial) सोडण्याबाबत वक्तव्य केलंय. तन्वीनं मालिका सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. 

Continues below advertisement

'बिग बॉस मराठी 6'ची विजेती तन्वी कोलते हिनं नुकतीच एका मराठी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तन्वीनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. बिग बॉसच्या घरात असतानाच तिचं सोशल मीडिया अकाउंट डिलिट झालेलं, त्यावरही तिनं भाष्य केलंय. त्यासोबतच तिनं 'लक्ष्मी निवास' मालिका का सोडली? यावरही कोणतेही आढेवेढे न घेता, स्पष्टच सांगून टाकलंय. 

Continues below advertisement

'लक्ष्मी निवास' मालिका सोडण्याबाबत तन्वी कोलते नेमकं काय म्हणाली? 

'बिग बॉस मराठी' सीझन 6 जिंकणारी अभिनेत्री तन्वी कोलते म्हणाली की, "लक्ष्मी निवास' मालिकेत माझा ट्रॅक खूपच कमी झाला होता आणि माझ्या व्यक्तिरेखेचा 'स्क्रीनटाइम'सुद्धा कमी झाला होता. त्यामुळे पुढे काय करायचं, याचा विचार सुरू होता. टीमसोबत चर्चा झाली होती की, इतर संधी स्वीकारता येतील आणि नेमकी त्याच काळात 'बिग बॉस मराठी'बाबत विचारणा झाली. अर्थात, निर्णय घेणं कठीण होतं, पण कलाकार म्हणून निर्णय योग्य होता..."

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाणारी तन्वी कोलतेला झी मराठी वरच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत वर्णी लागली. त्यानंतर तन्वीनं अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तन्वी प्रामुख्यानं इंस्टाग्रामवर रील्स, फॅशन, लाइफस्टाइल आणि रिलेटेबल व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाली.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीपासूनच तन्वी कोलतेचा स्ट्राँग आणि बिनधास्त गेम प्ले दिसून आला. इतर स्पर्धकांसोबत वाद आणि स्पष्ट भूमिका यामुळे ती चर्चेत राहिली. बिग बॉसमध्ये दिलेल्या टास्कमध्ये तिचा अॅक्टिव्ह सहभाग दिसून आला. तसेच बेधडक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात तन्वीची वेगळी ओळख निर्माण केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tanvi Kolte On Ruchita Jamdar: 'ती मला खरकटी म्हणाली होती...'; रुचिता जामदारनं केलेल्या सिगारेटच्या आरोपांवर तन्वी कोलतेचं सडेतोड उत्तर