Mangal Budh Yuti 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्याच्या शेवटी एक खास संयोग जुळून येणार आहे. याचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 22 एप्रिल रोजी म्हणजेच आज बुध ग्रह रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. तर, 24 एप्रिल रोजी मंगळ ग्रह याच नक्षत्रात येणार आहे. यामुळे 24 एप्रिलला रेवती नक्षत्रात मंगळ-बुध ग्रहाची युती होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा बुद्धीचा ग्रह बुध ग्रह आणि मंगळ ग्रह एकत्र येतात तेव्हा प्रभावशाली युती जुळून येते. त्यामुळे यंदाची युती फार खास असणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ बुध ग्रहाची युती फार खास असणार आहे. या काळात तुमच्यात नवीन ऊर्जा संचारेल. तसेच, या कालावधीत तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकता. कामकाजात तुमची पकड चांगली असेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. विरोधकांवर तुम्ही मात कराल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे ही युती तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या बोलण्याने इतर प्रभावित होतील. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगली नोकरी मिळेल. मीडिया, शेअर मार्केटशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
रेवती नक्षत्र मीन राशीत असल्यामुळे हा काळ सर्व राशींपैकी मीन राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल आणि लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. तसेच, तुमचं एखादं रखडलेलं काम तुम्हाला पूर्ण करता येईल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
