Bigg Boss Marathi 6: सध्या टीव्ही विश्वात बिग बॉस या शोची एकच चर्चा आहे. बिग बॉस मराठीमधील सगळेच कलाकार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मग ते मागच्या पर्वातील असो किंवा या सिझनमधील. बिग बॉस मराठीच्या घरातून अलिकडेच झालेल्या एलिमिनेशननंतर आता बिगबॉसच्या घरात एक वादळी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. राखी सावंतच्या धमाकेदार वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर आता बिगबॉसच्या घरात एक नवीन एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यात महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं... येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच असं कॅप्शन देत ही पोस्ट करण्यात आली आहे. बिग बॉस मराठी ६च्या घरात अस्सल स्वॅग, कडक वाइब्स, लूक झकास, मराठमोळा खास, फक्त तुमच्यासाठी लवकरच असं प्रोमोमध्ये म्हटलं आहे.

Continues below advertisement

कोणाची wild Card एन्ट्री होणार ?

बिगबॉस मराठीच्या घरात कोणाची एन्ट्री होणार? याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी वाईल्ड कार्ड म्हणून कोणता सदस्य घरात येऊ शकतो? याचे अंदाज बांधायला सुरुवात केलीय. अनेकांनी अभिजीत बिचूकलेचं नाव घेतलं आहे. तर काहींनी शिव ठाकरे आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशी घरात येऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय.

 

Continues below advertisement

बिग बॉसच्या घरात राखी सावंत आल्यानंतर पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. बिग बॉस ने घराचे संपूर्ण जबाबदारी राखीच्या हातात सोपवल्याने ती सगळ्या स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवते आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केल्यामुळे कॅप्टन पदाच्या शर्यतीतून राखीला बाहेर काढण्यात आलं होतं. दरम्यान या आठवड्यात नऊ सदस्यांवर नॉमिनेशनचे टांगती तलवार आहे. सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके ,अनुश्री माने , रोशन भजनकर, सागर कारंडे ,दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे रुचिता जामदार या सदस्यांचा यात समावेश आहे .