Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सीजन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचे उत्सुकतेने वाट पाहिली जात होती तो बहुचर्चित रियालिटी शो 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रविवार पासून घरात स्पर्धकांची धमाल भांडण टास्क आणि मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार असून यंदाच्या सीजनमध्ये 16हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. शो सुरु होण्यास आता मोजकेच दिवस उरलेले असताना यंदा बिग बॉसच्या घरात कोणकोणत्या सेलिब्रेटी दिसणारी याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही उत्सुकता कलर्स मराठी वाहिनीने आणखी ताणली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर बिग बॉस मधील स्पर्धकांचे प्रमुख हळूहळू समोर येत आहेत.
नुकत्याच एका प्रोमोमध्ये सौंदर्य आणि बोल्ड अंदाज घेऊन घरातलं वातावरण हॉट - हॉट करायला येते ही नखरेल गर्ल असं म्हणत तिची ओळख करून देण्यात आली आहे. हा प्रोमो पाहताच ही स्पर्धक नेमकी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. पण प्रेक्षकही चतूर आहेत. प्रोमोमधील या तरुणीचा कमरेवरचा टॅटू बघून या प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीला ओळखलंय.
तरुणीचा कमरेवरचा टॅटू बघून प्रेक्षकांनी ओळखलं
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये बोल्ड अंदाजात एक सौंदर्यवती येते. तिच्या अंदाजाने बिग बॉसच्या घरात धमाका होणार हे निश्चित असे बोलले जात आहे. सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन ही अभिनेत्रीच्या येण्याने स्टेजवर अक्षरशः माहोल बदलला आहे. तिचा धमाकेदार डान्स पाहताना चाहत्यांना तिच्या दंडावर आणि कमरेवर टॅटू असल्याचं पाहायला मिळालं. या टॅटूमुळे ही सुपर मॉडेल सोनाली राऊत असल्याचं प्रेक्षकांनी आधीच ओळखलं आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. यात जवळपास अनेकांनी ही सोनाली राऊत असल्याचं म्हटलंय.
कोण आहे सोनाली राऊत?
सोनाली राऊत ही प्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री आहे. रणवीर सिंगसोबत 2011 मध्ये एका मासिकासाठी हॉट अंदाजात एक फोटोशूट केल्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली होती. हिंदी बिग बॉसच्या आठव्या सीजनमध्येही ती दिसली होती. या सीजन मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती टॉप फाईव्ह मध्ये पोहोचली आणि तयारी न करता तिचा रोजच्या कपड्यांमध्ये ती स्टेजवर आली. तिची ही शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. बिग बॉसच्या घरात झालेल्या नॉमिनेशन मध्ये तिला अचानक बाहेर काढण्यात आलं होतं. पण तिचे लोकप्रियता इतकी होती की तिला परत आणण्यात आलं.
सोनाली राऊत ही लोकप्रिय मॉडेल उज्वला राऊतची धाकटी बहीण आहे. तिचे वडील उपायुक्त आहेत. सोनाली राऊतने किंगफिशर कॅलेंडर मॅक कॉस्मेटिक्स पीसी चंद्रा ज्वेलर्स लिमका इत्यादी अनेक मोठ्या ब्रँड साठी मॉडेल म्हणून काम केले आहे. 2014 मध्ये आलेल्या द एक्सपोज या बॉलिवूड चित्रपटात सोनालीने हिमेश रेशमी आणि हनी सिंग सोबत काम केलं होतं. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झालं होतं. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात तिची एन्ट्री धमाकेदार होणार हे निश्चित.